आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये 45 कोटी 60 लाखांहून अधिक व्यक्तींना लसीच्या मात्रा देण्यात आल्या


गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या 51 लाखांहून जास्त मात्रा देण्यात आल्या

रोगमुक्तीचा दर सध्या 97.38%

देशात गेल्या 24 तासांत 44,230 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या (4,05,155) सध्या एकूण बाधितांच्या संख्येच्या 1.28%

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (2.44%) गेले सलग 53 दिवस 5% पेक्षा कमी राहिला आहे

Posted On: 30 JUL 2021 10:19AM by PIB Mumbai

भारतातील लसीकरण मोहिमेत दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या संख्येने काल 45 कोटी 60 लाखांचा आकडा पार केला. आज सकाळी 8  वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 54,50,378 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 45,60,33,754 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 51,83,180 मात्रा देण्यात आल्या.

दिल्या गेलेल्या एकूण मात्रांमध्ये खालील मात्रांचा समावेश आहे:

 

HCWs

1st Dose

1,02,98,871

2nd Dose

77,94,788

FLWs

1st Dose

1,79,23,328

2nd Dose

1,11,57,062

Age Group 18-44 years

1st Dose

14,95,34,704

2nd Dose

76,78,805

Age Group 45-59 years

1st Dose

10,37,58,165

2nd Dose

3,75,98,059

Over 60 years

1st Dose

7,46,25,671

2nd Dose

3,56,64,301

Total

45,60,33,754

 


कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवत नेऊन मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,07,43,972 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 42,360 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. यामुळे सकल रोगमुक्ती दर 97.38% झाला आहे.


 



 

गेल्या 24 तासांत भारतात, 44,230 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग तेहतीस दिवस, 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या अखंडित आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 4,05,155 इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.28% इतके आहे.
 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 18,16,277 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 46 कोटींहून अधिक (46,46,50,723) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात एका बाजूला चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.43% आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.44% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सलग 53 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

 



****


STupe/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1740630) Visitor Counter : 194