उपराष्ट्रपती कार्यालय
बालकांसाठी कोविड लस लवकर विकसित करण्याची उपराष्ट्रपतींची वैज्ञानिक जगाला विनंती
भारत बायोटेकला भेट, कमी कालावधीत परिणामकारक लस विकसित केल्याबद्दल वैज्ञानिकांची केली प्रशंसा
Posted On:
30 JUL 2021 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जुलै 2021
उपराष्ट्रपती एम वेंकैया नायडू यांनी आज विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना बालकांसाठी कोविड लस विकसित करण्यास गती देण्याची विनंती केली. विषाणूपासून बालकांचे संरक्षण करण्यास प्राधान्य असणे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.
कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिम ही जनआंदोलन बनायला हवी हे आग्रहाने सांगत त्यांनी लोकांना लसींच्या आवश्यक मात्रा घेऊन स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे आवाहन केले.
भारत बायोटेक या संस्थेच्या हैदराबादमधील जीनोम व्हॅली येथील प्रकल्पाला दिलेल्या भेटीनंतर संस्थेचे वैज्ञानिक व कर्मचारी वर्गाशी संवाद साधताना ते म्हणाले की लसींबद्दल उदासीन राहणे परवडणारे नाही. प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे अशी विनंती करताना “याशिवाय आपल्याला व आपल्या जवळच्यांना संरक्षित करण्याचा ठोस दुसरा मार्ग नाही. ” असे त्यांनी नमूद केले.
नाकातून घेण्याजोगी कोविड लस विकसित करणे ही महत्वाची गोष्ट आहे सांगत त्यांनी यामुळे लसींबाबतची उदासिनता कमी होऊन लसीकरणाचे व्यवस्थापन सुधारेल असे सांगितले.
लसीकरणाचे अनेक फायदे असून ज्ञात तोट्यांपेक्षा ते कित्येक पटींनी जास्त आहेत असे ते म्हणाले. हा थेट संदेश सर्वदूर, प्रत्येकापर्यंत व देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. लसीकरणामुळे संसर्ग झालेल्या रुग्णाला रुग्णालयात भरती होणे तसेच आजार विकोपाला जाणे, टाळता येते.
भारत बायोटेकमधील सोयीसुविधांचा त्यांनी आढावा घेतला व कंपनीने देशातील आणि देशाबाहेरील लसीकरणात महत्वपूर्ण सहभाग घेतल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1740855)
Visitor Counter : 225