आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी एनसीडीसीच्या 112व्या वर्धापन दिनानिमित्त एएमआरच्या संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारणाच्या राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळेचे आणि नव्या बीएसएल 3 प्रयोगशाळेचे डिजिटल पद्धतीने केले उद्‌घाटन

Posted On: 30 JUL 2021 2:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2021

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह आज नवी दिल्ली येथे एनसीडीसी अर्थात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या 112व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी एएमआरअर्थात सूक्ष्मजीव प्रतिबंधासाठीच्या संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारणाच्या राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळेचे, बीएसएल 3 अर्थात जैवसुरक्षा पातळी 3 च्या प्रयोगशाळेचे तसेच पदवीपश्चात अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांचे वसतिगृह  आणि अतिथी निवासाचे  आभासी पद्धतीने उद्‌घाटन केले.

एनसीडीसीच्या योगदानाबद्दल अभिनंदन करून, मनसुख मांडवीय म्हणाले की, भारताने कोविड महामारीशी सामना करण्यात अनेक देशांपेक्षा उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. आज सुरु करण्यात आलेल्या नव्या सुविधांमुळे एनसीडीसीच्या 112 वर्षांच्या यशस्वी परंपरेत नवी परिमाणे जोडली आहेत. केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी उपयुक्त होईल असे काम करण्याच्या दृष्टीने अधिकाधिक नाविन्यपूर्ण संशोधनासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांनी एनसीडीसीला प्रोत्साहित केले.

 अलीकडच्या काळात आलेल्या कोविड-19 महामारीने प्राणीजन्य रोगांबाबत खबरदारी घेण्याची तसेच जाणीव निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यानुसार एनसीडीसीमध्ये सुरु असलेल्या प्राणीजन्य रोगांचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठीच्या राष्ट्रीय एकल आरोग्य कार्यक्रमा अंतर्गत प्राणीजन्य आजारसंबंधी कार्यक्रम विभागाने रेबीज, स्क्रब टायफस, ब्रूसेलॉसिस, अँन्थ्रॅक्स, सीसीएचएफ, निपाह, क्यासनूर जंगलजन्य आजार या भारतातील 7 प्रमुख प्राणीजन्य आजारांची माहिती देणारे छापील, श्रवणीय आणि दृश्य स्वरूपातील आयईसी अर्थत माहिती, शिक्षण आणि संवाद साहित्य निर्माण केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांसह या साहित्याचे देखील प्रकाशन केले.

 केंद्रीय मंत्री मांडवीय यांनी वायू प्रदूषणाबाबतच्या राष्ट्रीय आरोग्य स्विकारण योजना आणि उष्णतेशी संबंधित राष्ट्रीय आरोग्य स्विकारण योजना यांचे माहितीवजा वर्णनात्मक चित्रांसह उद्‌घाटन केले तसेच एनसीडीसीच्या पर्यावरणीय आणि व्यवसायसंबंधी आरोग्य, हवामान बदल आणि आरोग्य केंद्राने विकसित केलेल्या राष्ट्रीय हवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमाचे देखील उद्‌घाटन केले.

 केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार म्हणाल्या की, एनसीडीसी त्यांच्या विविध प्रयोगशाळांच्या माध्यमातून महामारीविषयक, सार्वजनिक आरोग्याची क्षमता बांधणी आणि कीटकशास्त्राविषयी जनतेला अनेक प्रकारच्या सेवा पुरवीत आहे. देशाच्या एएमआरअर्थात सूक्ष्मजीव विरोधी प्रतिबंधक कार्यक्रमातील एनसीडीसीची भूमिका स्तुत्य आहे.

 या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक डॉ.सुनील कुमार, अतिरिक्त सचिव आरती आहुजा, संयुक्त सचिव लव अगरवाल, एनसीडीसीचे संचालक डॉ सुजित सिंग आणि जागतिक आरोग्य संघटनेचे  भारतातील प्रतिनिधी डॉ.रॉडेरिको एच.ऑफ्रीन हे देखील उपस्थित होते.

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1740658) Visitor Counter : 261