PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 27 JUL 2021 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 27 जुलै 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानाअंतर्गत आतापर्यंत लसीच्या 44.19 कोटी मात्रा देण्यात आल्या.

आतापर्यंत देशभरात एकूण  3,06,21,469  कोरोनामुक्त

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा  दर 97.39%

गेल्या 24 तासात 42,363 रुग्ण कोविडमुक्त झाले

गेल्या 132 दिवसांनतर,एका दिवसांत 30,000 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली असून ,गेल्या 24 तासात 29,689 नव्या रुग्णांची नोंद, झाली आहे.

देशात 124 दिवसांनंतर  उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,00,000 हून  कमी झाली असून सध्या ती  3,98,100 आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या,आतापर्यंतच्या  एकूण रुग्णांच्या  1.27%

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 5% पेक्षा कमी, सध्या हा दर 2.33%

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.73% असून  हा दर 5% पेक्षा कमी

चाचण्यांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ, एकूण 45.91 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

इतर अपडेट्स :

  • सर्व स्त्रोतांद्वारे राज्य/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसीच्या 45.73 कोटी (45,73,30,110) पेक्षा जास्त मात्रा पुरविण्यात आल्या आहेत आणि आणखी 24,11,000 मात्रा उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी वाया झालेल्या मात्रांसह एकूण 43,80,46,844 मात्रांचा वापर करण्यात आला आहे. (आज सकाळी 8 वाजता उपलब्ध माहितीनुसार). राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे अद्याप 2.28 कोटींपेक्षा जास्त मात्रा (2,28,27,959) लसीकरणासाठी शिल्लक आहेत.
  • प्रसारमाध्यमांमध्ये अलीकडेच प्रसारित झालेल्या,  MedRxiv वर सादर करण्यात आलेल्या  मात्र त्या क्षेत्रातील तज्ञांनी मान्यता न दिलेल्या आढाव्यासंदर्भातील अभ्यासावर आधारित अहवालात , ‘एका वर्षामध्ये सुमारे 27% जास्त मृत्यू’.या आशयाखालील वृत्तामध्ये  तीन वेगवेगळे माहिती संच नमूद करत असा आरोप करण्यात आला आहे की,   कोविड -19 च्या दोन लाटां दरम्यान भारतात किमान  2.7 ते  3.3  दशलक्ष कोविड -19  मृत्यू झाले. वृत्तामध्ये पुढे निष्कर्ष काढण्यात आला आहे की, अधिकृतपणे नोंदविण्यात आलेल्या संख्येपेक्षा भारतातील मृत्यूंची संख्या जवळपास 7-8 पट जास्त असू शकते आणि असा दावा करण्यात आला आहे की, , हे बहुतांश अतिरिक्त मृत्यू कोविड 19 मृत्यू झाले असावेत.’ अशी चुकीच्या माहितीवर आधारित वृत्त दिशाभूल करणारी आहेत.
  • कोविड 19 महामारी विरुद्धचा लढा भारत सरकार आघाडीवर राहून लढत आहे. या महामारीविरुद्ध लढण्यासाठी भारत सरकारची पंचसूत्री चाचणी, मागोवा, उपचार आणि कोविड प्रतिबंधक योग्य वर्तन यासह लसीकरण हा एक अविभाज्य घटक आहे. भारतीयांना कोविड प्रतिबंधक लसीच्या अर्धा अब्ज मात्रा देण्याचे उद्दिष्ट भारताला जुलै 2021 अखेरपर्यंत पूर्ण करता येणार नाही अशी टीका करणारी वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये अलीकडेच प्रसारित झाली आहेत.

 

M.Chopade/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739677) Visitor Counter : 133


Read this release in: English , Hindi , Punjabi , Gujarati