आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड 19 मृत्यू : गैरसमज आणि वस्तुस्थिती


कोविड 19 मृत्यूंच्या योग्य नोंदीसाठी आयसीडी -10 संहितेच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीवर आधारित आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचे भारताकडून पालन

जन्म आणि मृत्यूची संस्थात्मक नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी वैधानिक आधारित नागरी नोंदणी प्रणालीचे (सीआरएस) बळकटीकरण

अनेक दशकांपासून भारतात वैधानिक आधारित नागरी नोंदणी प्रणालीची अंमलबजावणी , त्यामुळे कोविड 19 मृत्यू नोंदी झाल्या नसल्याची शक्यता कमी

Posted On: 27 JUL 2021 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2021

प्रसारमाध्यमांमध्ये अलीकडेच प्रसारित झालेल्या,  MedRxiv वर सादर करण्यात आलेल्या  मात्र त्या क्षेत्रातील तज्ञांनी मान्यता न दिलेल्या आढाव्यासंदर्भातील अभ्यासावर आधारित अहवालात , ‘एका वर्षामध्ये सुमारे 27% जास्त मृत्यू ''.या आशयाखालील वृत्तामध्ये  तीन वेगवेगळे माहिती संच नमूद करत असा आरोप करण्यात आला आहे की,   कोविड -19 च्या दोन लाटां दरम्यान भारतात किमान  2.7 ते  3.3  दशलक्ष कोविड -19  मृत्यू झाले.

वृत्तामध्ये  पुढे निष्कर्ष काढण्यात आला आहे कीअधिकृतपणे नोंदविण्यात आलेल्या संख्येपेक्षा  भारतातील मृत्यूंची  संख्या जवळपास 7-8 पट जास्त असू शकते आणि असा दावा करण्यात आला आहे  की, , हे बहुतांश अतिरिक्त मृत्यू कोविड 19 मृत्यू  झाले असावेत.’ अशी  चुकीच्या माहितीवर आधारित वृत्त दिशाभूल करणारी आहेत.

असे  स्पष्ट करण्यात येते  आहे कीकोविड संदर्भातील माहिती  व्यवस्थापन करण्याचा केंद्र सरकारचा दृष्टिकोन पारदर्शक आहे आणि कोविड -19 संबंधित सर्व मृत्यूची नोंद ठेवण्याची एक सक्षम  यंत्रणा अस्तित्वात आहे. माहिती सातत्याने अद्ययावत करण्याची जबाबदारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर    सोपविण्यात आली आहे.

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या या नोंदींसोबतच , वैधानिक  आधारित नागरी नोंदणी प्रणाली (सीआरएस) च्या बळकटीकरणामुळे देशातील सर्व जन्म आणि मृत्यूची नोंद सुनिश्चित करण्यात येते. माहिती  संकलन, शुद्धीकरण , संख्या  एकत्रित करणे  आणि प्रकाशित करणे या प्रक्रिया वैधानिक  आधारित नागरी नोंदणी प्रणाली करते. लांबलचक प्रक्रिया असली तरी मृत्यूची नोंद चुकणार नाही, हे ही प्रक्रिया सुनिश्चित करते. या प्रणालीची  विस्तृतता आणि व्यापकतेमुळे ही संख्या सहसा  पुढील वर्षी प्रकाशित केली जाते.

निर्धारित  मार्गदर्शक सूचनांनुसार मृत्यूच्या नोंदीसाठीचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय औपचारिक संवादाद्वारे , एकाधिक दूरदृश्य प्रणालींच्या माध्यमातून  आणि केंद्रीय पथकांच्या  तैनातीद्वारे वारंवार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना देत आहे. राज्यांना त्यांच्या रुग्णालयांमध्ये  सखोल परीक्षण  करण्याचा आणि एखाद्या रुग्णाची   किंवा मृत्यूची नोंद  जिल्हावार  आणि तारीखवार तपशीलांतून  राहून गेली  असेल तर  माहितीवर आधारित  निर्णय घेण्यासंदर्भात मार्गदर्शनाचा सल्ला देण्यात आला आहे

याशिवाय, मृत्यूच्या संख्येतील विसंगती किंवा गोंधळ टाळण्यासाठीमे 2020 च्या सुरुवातीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने  (आयसीएमआर) देखील कोविड 19 मृत्यूंची योग्य नोंदणी व्हावी या दृष्टीने, मृत्यु दर नोंदणीसाठी  जागतिक आरोग्य संघटनेने  शिफारस केलेल्या आयसीडी -10 संहितेनुसार मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत .

दुसरी लाट शिखरावर असताना , देशभरातील आरोग्य यंत्रणेने वैद्यकीय मदतीची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले,त्यामुळे कोविड मृत्यूचे योग्य अहवाल देणे आणि नोंदणी करायला विलंब झाला असावा  मात्र त्यानंतर नंतर राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी सामंजस्याने हे कार्य केले. भारतात बळकट  आणि वैधानिक -आधारित मृत्यू नोंदणी प्रणाली असल्यामुळे संसर्गजन्य आजारसाथीची तत्व आणि व्यवस्थापना नुसारकाही रुग्ण बाधीत आढळले नाहीत आणि  मृत्यूच्या नोंदी झाल्या नसल्याची शक्यता कमी आहे.

हे सार्वत्रिक सत्य आहे की, कोविड महामारीसारख्या गडद आणि दीर्घकालीक  सार्वजनिक आरोग्य संकटादरम्यान नेहमीच मृत्युच्या नोंदणीमध्ये काहीसा फरक आढळू शकतो. एखाद्या घटनेनंतर मृत्यूसंदर्भातील माहिती  विश्वसनीय स्त्रोतांकडून उपलब्ध झाल्यानंतर सामान्यतः मृत्यूसंदर्भात अभ्यासपूर्ण संशोधन केले जाते. अशा अभ्यासासाठी असलेल्या कार्यपद्धती व्यवस्थित प्रस्थापित आहेत, माहिती स्रोत परिभाषित केले आहेत तसेच मृत्यु दर मोजण्यासाठी वैध धारणा देखील आहेत.

 

 Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739560) Visitor Counter : 310