संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ताजिकिस्तानमधील एससीओ या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार

Posted On: 27 JUL 2021 2:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2021

प्रमुख वैशिष्ट्ये:

  • संरक्षण मंत्री आज दुशांबेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत
  • उद्या ते एससीओ संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करणार
  • सदस्य देशांमध्ये संरक्षण सहकार्याच्या मुद्यांवर चर्चा
  • संरक्षणमंत्र्यांची ताजिक मधील आपल्या समपदस्थांशी भेट होणे अपेक्षित

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या वार्षिक बैठकीस उपस्थित राहण्यासाठी, दिनांक 27-29 जुलै 2021 या कालावधीत ताजिकिस्तानमधील दुशांबेला भेट देणार आहेत. या वार्षिक बैठकीत एससीओ सदस्य देशांमधे संरक्षण सहकार्यच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे आणि चर्चा झाल्यानंतर निवेदन जाहीर होण्याची शक्यता आहे. या सभेत राजनाथ सिंह 28 जुलै 2021 रोजी बैठकीला संबोधित करतील.

आपल्या दुशांबे दौऱ्यादरम्यान संरक्षणमंत्री ताजिक येथील आपले समपदस्थ कर्नल जनरल शेराली मिर्झो यांना भेटून द्विपक्षीय मुद्यांवर आणि परस्पर हितसंबंधांच्या इतर मुद्यांवर चर्चा करणार आहेत.

ताजिकिस्तानकडे यावर्षीचे एससीओचे अध्यक्षपद आहे आणि मंत्री तसेच अधिकारी स्तरावर अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739426) Visitor Counter : 294