महिला आणि बालविकास मंत्रालय

महिला आणि बालविकास मंत्रालयाने पीएम केअर्स योजनेअंतर्गत, पात्र असलेल्या बालकांचे अर्ज पाठविणे, सहाय्य मिळविण्यासाठी अशा मुलांची ओळख पटविणे, यासाठी pmcareforchildren.in वेबपोर्टल केले सुरू


अनाथ मुलांची, सातत्याने सर्वतोपरी काळजी घेणे आणि संरक्षण करणे, सुनिश्चित करणे हे या योजनेचे उद्दीष्ट

Posted On: 25 JUL 2021 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2021

 

महिला आणि बालविकास मंत्रालयाने, ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ या योजनेअंतर्गत अर्ज पाठविणे,सहाय्य करण्यासाठी त्या मुलांची ओळख पटविणे आणि त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुलभ करणे, सुनिश्चित करण्यासाठी वेब आधारित पोर्टल pmcareforchildren.in सुरू केले आहे. या पोर्टलवर बालकांची नोंदणी आणि लाभार्थ्यांची ओळख पटवण्याचे मोड्यूल कार्यान्वित केले आहे. पोर्टलवर नियमितपणे आवश्यक असलेली माहिती आणि मोड्यूल अद्ययावत केली जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ज्या बालकांचे आई-वडील, हयात असलेले एकमेव पालक, कायदेशीर पालक अथवा दत्तक पालक कोविड -19 महामारीत म्रुत्यूमुखी पडले आहेत, अशा बालकांना सहाय्य करण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन (PM CARES for children) या योजनेची  घोषणा केली होती. ज्या बालकांनी आपल्या पालकांना कोविड महामारीमुळे गमावले आहे, अशा सर्व मुलांची सर्वतोपरी काळजी आणि संरक्षणाची हमी सातत्याने घेणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आरोग्य विम्याद्वारे त्यांचे कल्याण करणे, शिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करणे आणि वयाच्या 23 व्या वर्षी स्वतःच्या अस्तित्वाला उपयुक्त ठरेल अशाप्रकारे 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करणे, या गोष्टींचा  या योजनेत अंतर्भाव आहे.

15 जुलै 2021 रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील एसीएस / प्रधान सचिव / महिला आणि बालविकास विभागाचे सचिव / सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणा विभाग यांचे सचिव यांच्यासाठी या योजनेचे सादरीकरण पोर्टलवर करण्यात आले होते. महिला आणि बाल विकास विभाग / सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग (जे योग्य असेल त्याप्रमाणे) यांना पाठविण्याच्या विनंतीसह,जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा बाल संरक्षण युनिट आणि बाल कल्याण अधिकारी यांचे लॉगिन आयडी आणि संकेतशब्द देखील संबंधित अधिकाऱ्यांसोबत सामायिक केले गेले आहेत. 

महिला आणि  बालविकास मंत्रालयाने दिनांक 22 जुलै 2021 रोजी सर्व केंद्र शासित प्रदेशांच्या प्रशासकांना आणि राज्यांच्या मुख्य सचिवांना त्यांच्या त्यांच्या राज्यातील जिल्हा दंडाधिका-यांना pmcaresforchildren योजनेअंतर्गत सहाय्य मिळविण्यासाठी पात्र असलेल्या मुलांची ओळख पटवून माहिती द्यावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच अशा  मुलांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी आणि त्यांना तातडीने मदत करण्यासाठी पात्र मुलांच्या तपशीलांसह pmcaresforchildren.in पोर्टलवर ते  प्रसिध्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना अशा  मुलांची  नोंदणी करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. हे काम पुढील 15 दिवसात पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी एक समर्पित मदत डेस्क स्थापन करण्यात आले आहे, ज्यावर दूरध्वनीद्वारे 011-23388074 या क्रमांकावर किंवा pmcares-children.wcd[at]nic[dot]in या ई-मेलद्वारे संपर्क करता येईल.

मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना तसेच राज्यांच्या मुख्य सचिवांना या पोर्टलवरील डेटा एन्ट्रीच्या प्रगतीवर व्यक्तिगतपणे लक्ष  ठेवण्याची विनंती केली आहे.

मुलांसाठी पंतप्रधान केअर अंतर्गत सहाय्यासाठी पात्र मुलांची ओळख पटविणे

योजना

पात्रता:

अशी सर्व मुले ज्यांनी

  1. दोन्ही पालक गमावले आहेत 
  2. एक पालक हयात असलेली
  3. कायदेशीर पालक / दत्तक पालक कोविड महामारीमुळे गमावलेली

अशी सर्व बालके या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असतील.

 

* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738902) Visitor Counter : 386