रेल्वे मंत्रालय

पहिल्यांदाच भारतीय रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस , बांग्लादेशात 200 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचे 10 कंटेनर घेऊन जाणार


ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून, भारतीय रेल्वेची रुग्णांना दिलासा देण्याची मोहीम सुरूच

Posted On: 24 JUL 2021 2:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जुलै 2021

भारतीय रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस आपला पुढचा प्रवास बांगलादेशात करण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच ऑक्सिजन एक्सप्रेसची परदेशातील मोहीम ठरणार आहे. आजच, या संदर्भातील दक्षिण पूर्व रेल्वे विभागाअंतर्गत 200 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी चक्रधरपूर इथल्या टाटा कार्यालयात करण्यात आली आहे. हा ऑक्सिजन बांगलादेशातील बेनापोल येथे जाणार आहे.

हा 200 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन भरण्याचे काम आज सकाळी 09.25  वाजता पूर्ण करण्यात आले.

भारतीय रेल्वेने देशभरातील राज्यांमध्ये असलेल्या कोविड रुग्णांना लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवठा व्हावा, या उद्देशाने 24 एप्रिल 2021 पासून ही ऑक्सिजन एक्सप्रेस सुरु केली आहे. या एक्सप्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत 35000 मेट्रिक टनपेक्षा अधिक द्रवरूप ऑक्सिजन 15 राज्यांत पोचवण्यात आला आहे. यासाठी 480 ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यात आल्या.

गरजेच्या ठिकाणी लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवठा करण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.

 

S.Tupe /R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1738534) Visitor Counter : 294