संरक्षण मंत्रालय
इंडोनेशियाला कोविड मदत साहित्य पुरवण्यासाठी आयएनएस ऐरावत जकार्ता इथे पोहोचले
Posted On:
24 JUL 2021 2:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2021
भारतीय नौदलाची युद्धनौका ऐरावत आज सकाळी म्हणजेच 24 जुलै 2021 रोजी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथे पोहोचले. या जहाजाने इंडोनेशियात कोविड मदत साहित्य पाठवण्यात आले आहे. कोविड महामारीचा सामना करण्यासाठी हे जहाज इंडोनेशियात, 100 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सीजन आणि 300 कॉनसँट्रेटर्स घेऊन गेले आहे.
आयएनएस ऐरावत हे लॅंडींग शिप टॅंक प्रकारातील मोठे जहाज असून, त्याचे काम जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी अनेक टॅंक, दोन्ही ठिकाणी चालणारी वाहने आणि इतर लष्करी समान घेऊन जाणे हे हे आहे. HADR मदत कार्यात, देखील ही युद्धनौका सहभागी झाली होती तसेच प्रशांत महासागर प्रदेशात देखील या युद्धनौकेने अनेक मदत कार्यात सहभाग घेतला आहे.
भारत आणि इंडोनेशिया यांच्यात दृढ सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध आहे. सुरक्षित भारत-प्रशांत महासागर परीसरासाठी हे दोन्ही देश संयुक्त मोहिमा राबवत असतात. तसंच द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ करणे आणि सामाईक गस्तीसाठी देखील दोन्ही देशांच्या नौदलांच्या संयुक्त मोहिमा सुरु असतात.
S.Tupe/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738527)
Visitor Counter : 293