पंतप्रधान कार्यालय
आषाढ पौर्णिमा - धम्मचक्र दिन कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचा संदेश.
कोरोना महामारीच्या काळातही भगवान बुद्धांची शिकवण कालसुसंगत - पंतप्रधान
बुद्धांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करत खडतर आव्हानांचा सामना कसा करावा हे भारताने दाखवून दिले : पंतप्रधान
जगाला संकटकाळात बुद्धांच्या शिकवणीची ताकद उमजली : पंतप्रधान
Posted On:
24 JUL 2021 8:58AM by PIB Mumbai
कोरोना महामारीच्या सध्याच्या काळात भगवान बुद्ध अधिक कालसुसंगत असल्याचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी म्हटले आहे.
बुद्धांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करत आम्ही आणखी खडतर आव्हानांचा सामना करु शकतो हे भारताने दाखवून दिले आहे. बुद्धांच्या शिकवणीचा मार्ग अनुसरत संपूर्ण जग एकसंध होत मार्गक्रमण करत आहे.
'प्रार्थनेसह काळजी' हा आतंरराष्ट्रीय बौध्द महासंघाचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे त्यांनी आषाढ पौर्णिमा - धम्मचक्र दिन कार्यक्रमाप्रसंगी आपल्या संदेशात सांगितले.
आपली बुद्धी, वाणी, कृती आणि प्रयत्न यातील सौहार्द आपल्याला वेदनेपासून दूर नेतील अर्थात आनंदाच्या दिशेने पुढे जाऊ असे पंतप्रधान म्हणाले.
चांगल्या काळात सर्वांच्या कल्याणासाठी काम करण्याकरता तर कठिण प्रसंगी परस्परांना बळ देण्याची प्रेरणा यामुळे मिळते. भगवान बुद्धांनी या सौहार्दासाठी आपल्याला अष्टमार्ग दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
त्याग आणि संयमाच्या अग्नीतून तावूनसुलाखून निघालेले बुद्ध जेव्हा बोलू लागतात तेव्हा ते केवळ शब्द उरत नाहीत, तर ते संपूर्ण धम्मचक्र प्रवर्तन होते. त्यांनी दिलेले ज्ञान जगाच्या कल्याणासाठीचा समानार्थी अर्थ ठरतो. यामुळेच आज संपूर्ण जगभरातील लोक त्यांचे अनुयायी होत आहेत असे पंतप्रधान म्हणाले.
धम्मपदाचा दाखला देत ,” वैराने वैर संपत नाही. वैर केवळ शांत मन आणि प्रेमानेच शांत होते” असे ते म्हणाले . जगाला संकटकाळात बुद्धांच्या शिकवणीची ताकद उमजली आहे. बुद्धांची ही शिकवण, मानवतेचा हा अनुभव जसजसा समृद्ध होईल हे जग समृद्धीची, यशाची नवनवी शिखरे सर करेल या शब्दात पंतप्रधानांनी आपल्या संदेशाची सांगता केली.
https://youtu.be/Sq6i8ZGgmqU
***********
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1738486)
Visitor Counter : 211
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam