रेल्वे मंत्रालय

राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्थेत (NRTI) शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील BBA, BSc, B Tech, MBA आणि MSc या शैक्षणिक कार्यक्रमांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

Posted On: 22 JUL 2021 7:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2021

रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था (NRTI) या वडोदरा येथील अभिमत विद्यापीठात BBA, BSc, B Tech, MBA आणि MSc या शैक्षणिक कार्यक्रमासाठी वर्ष 2021-22 प्रवेशासाठी अर्ज  करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. बारावीच्या परीक्षांच्या निकालांचे वेळापत्रक, जेईई, मेन्स व विद्यापीठांचे पदवीचे निकाल तसेच AICTE UGC या शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशाच्या तारखांच्या अनुषंगाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवेश परीक्षेसाठी अर्ज तसेच ऑनलाइन नोंदणी विद्यार्थ्यांना www.nrti.edu.in. या संकेतस्थळावर करता येईल. फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.

अर्जासाठी नवीन मुदत:

  • BBA, BSc, MSc and MBA :   21 ऑगस्ट 2021
  • B. Tech.:  15 सप्टेंबर 2021

शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अभ्यासक्रमांची यादी

  • पदवी अभ्यासक्रम
  • BBA Transportation Management
  • BSc Transportation Technology
  • B.Tech. Rail Infrastructure Engineering
  • B. Tech. Rail Systems and Communication Engineering
  • B. Tech.Mechanical and Rail Engineering  (IRIMEE, जमलपूर)
  • पदव्युत्तर अभ्यासक्रम
  • MBA Transportation Management
  • MBA Supply Chain Management
  • MSc Transport Technology and Policy
  • MSc Transport Information Systems and Analytics
  • MSc Railway Systems Engineering & Integration

(युकेच्या बर्निंगहॅम विद्यापीठाच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय पदवी अभ्यासक्रम)

  • पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
  • PGDM Transportation/Logistics
  • PGDM Transport Infrastructure Development & Financing/ Project Management

संपर्क: info@nrti.edu.in

BBA, BSc व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्थेच्या देशभरातील विविध केंद्रात घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांवर आधारित असतील. तर BTech अभ्यासक्रमाला जेईई मेन्स प्रवेशपरिक्षेतील प्राविण्यानुसार  प्रवेश दिला जाईल.

NRTI ही संस्था रेल्वे आणि परिवहन क्षेत्रातील लक्ष्यदर्शी अभ्यासक्रम राबवते तसेच बर्किंगहॅम विद्यापीठ, बर्कले आणि कार्नेल यासारख्या जगभरातील सर्वोत्कृष्ट विश्वविद्यालयांच्या आंतरराष्ट्रीय सहयोगाने अभ्यासक्रम राबवते.

यावर्षी BBA BSc शैक्षणिक पदवी मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य भारतीय आणि परदेशी कंपनीतून  नोकऱ्या मिळाल्या आहेत.

 

S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1737863) Visitor Counter : 188