उपराष्ट्रपती कार्यालय

ईद-उल-जुहाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी दिल्या  जनतेला शुभेच्छा

Posted On: 20 JUL 2021 4:52PM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी ईद-उल-जुहाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांच्या संदेशाचा संपूर्ण मसुदा पुढे दिला आहे.

ईद-उल-जुहाच्या प्रसंगी मी आपल्या देशातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देऊन अभिनंदन करतो.

ईद-उल-जुहा  त्यागाचा सण असून परमेश्वराच्या प्रती परमोच्च श्रद्धेचे प्रतिक आहे.

आपल्या देशात, उत्सव म्हणजे कुटुंबीय आणि समुदायांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा प्रसंग असतो. मात्र सध्या सुरु असलेल्या कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे आपल्याला या वर्षी साधेपणाने हा सण साजरा करण्यात समाधान मानावे लागणार आहे. प्रत्येकाने खूप सावधानता बाळगून आणि कोविड विषयक सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन ही ईद साजरी करण्याची मी सर्वांना विनंती करतो.

यावर्षीची ईद आपल्या जीवनात शांती, एकोपा आणि आनंद घेऊन येणारी ठरो.  

 

या संदेशाचे हिंदी रुपांतर खाली दिले आहे-

मैं 'ईद-उल-जु़हा' के पावन अवसर पर अपने देशवासियों को हार्दिक बधाई और शुभकामनाएँ देता हूँ।

कुर्बानी का त्योहार 'ईद-उल- जु़हा' भगवान के प्रति परम श्रद्धा का प्रतीक है।

हमारे देश में त्योहार परिवारों और समुदायों के एक साथ मिलकर खुशियाँ मनाने के अवसर होते हैं। परंतु वर्तमान कोविड-19 विश्वव्यापी महामारी के कारण हमें इस वर्ष इस त्योहार को सादगी के साथ मनाकर ही संतोष करना होगा। मेरी सब से अपील है कि आप पूरी एहतियात बरतते हुए और कोविड सुरक्षा संबंधी मानकों का पालन करते हुए ईद का पर्व मनाएँ।

मैं कामना करता हूँ कि ईद-उल-जु़हा का यह पर्व हमारे जीवन में शांति, सद्भाव और खुशियाँ लाए।

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1737227) Visitor Counter : 139