PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 19 JUL 2021 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 19 जुलै 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

देशातील लसीकरण मोहिमेमध्ये दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसींच्या एकूण मात्रांची संख्या आता 40 कोटी 64 लाखांहून अधिक झाली आहे. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 50,69,232 सत्रे आयोजित करून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 40,64,81,493 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 13,63,123 मात्रा देण्यात आल्या आहेत.

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे सार्वत्रिकीकरण करण्याचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. देशभरात लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार वाढविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

महामारीच्या सुरुवातीपासून कोविड बाधित झालेल्यांपैकी 3,03,08,456 व्यक्ती यापूर्वीच कोविडमधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 38,660  कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले आहेत. यामुळे एकंदर रोगमुक्ती दर 97.32% झाला असून यावरून रोगमुक्ती दराचा सतत वाढता कल दिसून येतो आहे.

देशात , गेल्या 24 तासांत, 38,164 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेले सलग 22 दिवस, रोज नोंद होणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,21,665 आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.35% इतके आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांचा वेग लक्षणीय प्रमाणात वाढविण्यात आला असून गेल्या 24 तासांच्या कालावधीत देशात एकूण 14,63,593 चाचण्या करण्यात आल्या. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 44 कोटी 54 लाखांहून जास्त (44,54,22,256) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात एका बाजूला चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येत असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात देखील सातत्याने घसरण दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.08%  आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.61% इतका आहे. गेले सलग 28 दिवस हा दर 3% हून कमी तर गेले सलग 42 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

इतर अपडेट्स :

महाराष्ट्र अपडेट्‌स:-

रविवारी महाराष्ट्रात 9000 कोविड रुग्णांची आणि 180 कोविड मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 62,14,190 झाली असून कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या 1,27,031 इतकी झाली आहे. विविध रुग्णालयांतून 5,756 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने, कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 59,80,350 झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णसंख्या 1,03,486 इतकी आहे. राज्यात आतापर्यंत 4,54,81,252 कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.

गोवा अपडेट्‌स:-

राज्यव्यापी संचारबंदी आदेशाची मुदत 26 जुलै 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. या काळात निर्बंध आणि सवलती आताप्रमाणेच लागू राहतील. गोव्यातील एकूण कोरोना- रुग्णसंख्या 1,69,740 पर्यंत पोहोचली असून, कोरोनाबळींची संख्या 3,111 झाली आहे. तर आतापर्यंत 1,65,067 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत व 1,562 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

M.Chopade/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1736973) Visitor Counter : 34


Read this release in: English , Hindi , Punjabi , Gujarati