आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 40 कोटी 64 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


रोगमुक्तीचा दर वाढून 97.32% पर्यंत पोहोचला

गेल्या 24 तासांत 38,164 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतात सध्या कोविड सक्रीय असणाऱ्या रुग्णांची संख्या (4,21,665) आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.35%

दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (2.61%) सलग 28 व्या दिवशी 3% हून कमी

Posted On: 19 JUL 2021 10:13AM by PIB Mumbai

देशातील लसीकरण मोहिमेमध्ये दिल्या गेलेल्या कोविड प्रतिबंधक लसींच्या एकूण मात्रांची संख्या आता 40 कोटी 64 लाखांहून अधिक झाली आहे. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत 50,69,232 सत्रे आयोजित करून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 40,64,81,493 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 13,63,123 मात्रा देण्यात आल्या आहेत.

त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

 

HCWs

1st Dose

1,02,69,922

2nd Dose

75,52,270

FLWs

1st Dose

1,77,95,125

2nd Dose

1,03,66,268

Age Group 18-44 years

1st Dose

12,50,80,488

2nd Dose

49,07,782

Age Group 45-59 years

1st Dose

9,76,43,768

2nd Dose

2,93,47,090

Over 60 years

1st Dose

7,21,55,133

2nd Dose

3,13,63,647

Total

40,64,81,493

 

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे सार्वत्रिकीकरण करण्याचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. देशभरात लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार वाढविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

महामारीच्या सुरुवातीपासून कोविड बाधित झालेल्यांपैकी 3,03,08,456 व्यक्ती यापूर्वीच कोविडमधून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 38,660  कोरोना रुग्ण रोगमुक्त झाले आहेत. यामुळे एकंदर रोगमुक्ती दर 97.32% झाला असून यावरून रोगमुक्ती दराचा सतत वाढता कल दिसून येतो आहे.

 

 

देशात , गेल्या 24 तासांत, 38,164 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेले सलग 22 दिवस, रोज नोंद होणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,21,665 आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.35% इतके आहे.

 

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांचा वेग लक्षणीय प्रमाणात वाढविण्यात आला असून गेल्या 24 तासांच्या कालावधीत देशात एकूण 14,63,593 चाचण्या करण्यात आल्या. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात 44 कोटी 54 लाखांहून जास्त (44,54,22,256चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

देशभरात एका बाजूला चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येत असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दरात देखील सातत्याने घसरण दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.08%  आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.61% इतका आहे. गेले सलग 28 व्या दिवशी हा दर 3% हून कमी तर गेले सलग 42 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

 

 

****

 

Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1736696) Visitor Counter : 235