आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशातील कोविड प्रतिबंधक लसीकरण 38.76 कोटीहून अधिक


रुग्ण बरे होण्याचा दर 97.28%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 38,792 नवे दैनंदिन रुग्ण

भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या (4,29,946) ही आतापर्यंतच्या एकूण रुग्ण संख्येच्या केवळ 1.39%

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.10%) सलग 23 व्या दिवशी पॉझीटीव्हिटी दर 3% कमी

Posted On: 14 JUL 2021 11:07AM by PIB Mumbai

भारतात एकूण 38.76 कोटीहून अधिक  कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 49,10,876 सत्रांद्वारे  38,76,97,935 मात्रा देण्यात आल्या  आहेत.गेल्या 24 तासात 37,14,441 मात्रा देण्यात आल्या.

 

21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा  टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,01,04,720 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 41,000 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 97.28%, असून याचा आलेख चढता आहे.

 

गेल्या 24 तासात 38,792 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

सलग 17 दिवस 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेशा यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 

भारतात आज उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,29,946 असून उपचाराधीन रुग्ण संख्या ही एकूण पॉझिटीव्ह रुग्ण संख्येच्या केवळ 1.39% आहे.

 

देशाच्या कोरोना चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ होत असून गेल्या 24 तासात 19,15,501 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत 43.59 कोटीहून अधिक (43,59,73,639) चाचण्या करण्यात आल्या.

देशात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असताना  साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर  सातत्याने खाली येत आहे. सध्या साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 2.25% आहे. आज दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.10% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी  दर  सलग 23 व्या दिवशी 3% इतका  कमी तर सलग 37 व्या दिवशी 5% पेक्षा कमी राहिला आहे.

 ***

Jaidevi PS/NC/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1735311) Visitor Counter : 225