शिक्षण मंत्रालय

कोविड-19 संदर्भातल्या नियमांचे अनुसरण करत नीट (युजी ) 2021 परीक्षा 12 सप्टेंबर 2021 ला होणार


अर्ज प्रक्रिया उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरु होणार

Posted On: 12 JUL 2021 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2021

नीट( युजी )2021 परीक्षा कोविड-19 संदर्भातल्या नियमांचे अनुसरण करत 12 सप्टेंबर 2021 ला घेण्यात येणार आहे. एनटीएच्या संकेतस्थळांद्वारे उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.

याआधी ही परीक्षा 1 ऑगस्ट 2021 ला  घेण्यात येणार होती.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा घेण्यात येणाऱ्या शहरांच्या संख्येत 155 वरून 198पर्यंत वाढ करण्यात आली आहे. 2020 मधल्या नियोजित 3862 परीक्षा केंद्रांच्या संख्येतही आता वाढ करण्यात येणार आहे.

कोविड-19 विषयीच्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्व उमेदवारांना केंद्रावर फेस मास्क पुरवण्यात येतील. प्रवेश आणि निर्गमन यासाठी प्रवेश आणि निर्गमन यासाठी चरणबद्ध वेळा, संपर्करहित नोंदणी, योग्य सॅनीटायझेशन, सोशल  डिस्टन्सिंगचे पालन करत आसन व्यवस्था सुनिश्चित करण्यात येणार आहे.  सर्व फर्निचर आणि साहित्य, आसने आणि सामयिक ठिकाणाचे परीक्षेआधी आणि नंतरही  सॅनीटायझेशन करण्यात येणार आहे. परीक्षा खोल्यामध्ये हवा खेळती राहावी यासाठी  खुल्या खिडक्या आणि पंखे असतील.

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1734891) Visitor Counter : 224