पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्य मंत्री म्हणून अश्विनी कुमार चौबे यांनी पदभार स्वीकारला
Posted On:
12 JUL 2021 2:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2021
अश्विनी कुमार चौबे यांनी आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्य मंत्री म्हणून नवी दिल्लीत पदभार स्वीकारला. पर्यावरण मंत्रालयाचे सचिव आर पी गुप्ता आणि मंत्रालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
पदभार स्वीकारण्यापूर्वी चौबे यांनी पर्यावरण मंत्रालयाच्या आवारात वृक्षारोपण केले.
गेल्या सात वर्षात पर्यावरण मंत्रालयाने अनेक अभूतपूर्व कामे केली असून वन आच्छादन वाढवण्याला आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आपल्याकडे सोपवण्यात आलेल्या जबाबदारी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी आभार मानले.
G.Chippalkatti/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1734786)
Visitor Counter : 1137