आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या कोविड – 19 लसीकरणाने ओलांडला 37.60 कोटींचा टप्पा


गेल्या 24 तासात 41,506 नवीन दैनंदिन रुग्णांची नोंद

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या (4,54,118) सध्या एकूण रुग्णसंख्येपैकी केवळ 1.47 %

दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट (2.25 %) सलग 20 व्या दिवशी 3 % पेक्षा कमी

43 कोटींपेक्षा अधिक कोविड चाचण्या आतापर्यंत करण्यात आल्या

Posted On: 11 JUL 2021 2:38PM by PIB Mumbai

 

भारताच्या एकूण कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 37.60 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी 7 वाजता उपलब्ध झालेल्या अहवालानुसार, एकूण 48,33,797 सत्रांमधून 37,60,32,586 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 37,23,367 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

 

यामध्ये समावेश आहे

HCWs

1st Dose

1,02,47,862

2nd Dose

74,02,098

FLWs

1st Dose

1,76,64,075

2nd Dose

98,91,050

Age Group 18-44 years

1st Dose

11,18,19,570

2nd Dose

37,01,692

Age Group 45-59 years

1st Dose

9,33,66,230

2nd Dose

2,35,53,988

Over 60 years

1st Dose

7,00,73,761

2nd Dose

2,83,12,260

Total

37,60,32,586

 

कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 रोजी प्रारंभ झाला आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

गेल्या 24 भारतात 41,506 दैनंदिन नवीन रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली आहे.

सलग 14 व्या दिवशी 50,000 पेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रसरकारच्या सामूहिक प्रयत्नांचाच हा परिणाम आहे. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0018IN2.jpg   

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,54,118 आहे आणि देशाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी सक्रीय रुग्णसंख्या केवळ 1.47 % इतकी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020V7O.jpg

महामारीच्या प्रारंभापासून ते आतापर्यंत 2,99,75,064 रुग्ण कोविड – 19 संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 41,526 जण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून सध्या तो 97.20 % वर पोहोचला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0033W56.jpg

चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत असून गेल्या 24 तासात देशभरात 18,43,500 चाचण्या घेण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 43 कोटींपेक्षा (43,08,85,470) जास्त चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

चाचण्यांच्या दरात एकीकडे वाढ होत असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दरात सातत्याने घट होताना दिसून येत आहे. सध्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा 2.32 % आहे, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट आज 2.25 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर सलग 20 दिवस 3 % पेक्षा कमी आहे. तर सलग 34 दिवस तो 5 % पेक्षा कमी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004JLRT.jpg

***

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1734582) Visitor Counter : 179