मंत्रिमंडळ

केंद्रीय  मंत्रिमंडळाने  इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीओएआय) आणि असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट्स (एसीसीए), ब्रिटन  (यूके) यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली

Posted On: 08 JUL 2021 8:32PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीओएआय) आणि असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट्स (एसीसीए), ब्रिटन  (यूके) यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे. एकमेकांच्या व्यावसायिक मंडळाची पात्रता मिळविण्यासाठी बहुतांश पेपरना  हजर राहण्यापासून सूट आणि संयुक्त संशोधन व व्यावसायिक विकासाची कामे सुरू ठेवण्यासाठी  दोन्ही संस्थांच्या सदस्यांना परस्पर प्रगत प्रवेश मिळेल. .

 

प्रभाव -

या सामंजस्य करारामुळे  ज्ञानाचे आदानप्रदान आणि संशोधन आणि प्रकाशनांची देवाणघेवाण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल जे दोन्ही कार्यक्षेत्रात सुशासन पद्धती मजबूत करेल. दोन्ही पक्ष कॉस्ट अकाउंटन्सी व्यवसायाशी संबंधित संयुक्त संशोधन सुरू करतील ज्यात तांत्रिक क्षेत्रात सहकार्यात्मक संशोधन असू शकते. हा सामंजस्य करार दोन्ही कार्यक्षेत्रातील व्यावसायिकांच्या हालचाली सुलभ करेल आणि भारतात तसेच परदेशात कॉस्ट अकाउंटंट्सची रोजगार क्षमता  वाढवेल.

 

तपशीलः

हा सामंजस्य करार एका  संस्थेच्या सदस्यांना व्यावसायिक स्तरावरील किमान विषय यशस्वीरित्या उत्तीर्ण करून अन्य  संस्थेचे  संपूर्ण सदस्यत्व मिळविण्यास सक्षम करण्यासाठी आणि दोन्ही कार्यक्षेत्रातील व्यावसायिकांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी  मार्ग दाखवेल.

 

पार्श्वभूमी:

इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाची स्थापना 1944 मध्ये कॉस्ट अकाउंटन्सी व्यवसायाला प्रोत्साहन , नियमन आणि विकास या उद्देशाने कंपनी कायदा अंतर्गत नोंदणीकृत कंपनी म्हणून 1944 मध्ये करण्यात आली. 28 मे  1959 रोजी, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटन्ट व्यवसायाचे नियमन करण्यासाठी वैधानिक व्यावसायिक संस्था म्हणून कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स  या संसदेच्या विशेष कायद्याद्वारे ही संस्था स्थापन केली गेली. ही संस्था ही एकमेव मान्यताप्राप्त वैधानिक व्यावसायिक संस्था आणि परवाना देणारी संस्था आहे जी खासकरून कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटन्सीमध्ये  काम करते.  1904 मध्ये स्थापना झालेल्या रॉयल चार्टरने इंग्लंड आणि वेल्सच्या कायद्यांतर्गत असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाइड अकाउंटंट्स (एसीसीए) ची स्थापना केली आहे, 2,27,000 पेक्षा जास्त पात्र सदस्य आणि 5,44,000 भावी  सदस्य असलेल्या व्यावसायिक लेखापालांसाठी ही  जागतिक संस्था आहे. .

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1733914) Visitor Counter : 285