पोलाद मंत्रालय
रामचंद्र प्रसाद सिंग यांनी पोलाद मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
Posted On:
08 JUL 2021 5:34PM by PIB Mumbai
रामचंद्र प्रसाद सिंग यांनी आज नवी दिल्लीत उद्योग भवन येथे पोलाद मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. पोलाद मंत्रालयाचे राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनी कॅबिनेट मंत्र्यांचे स्वागत केले.
पोलाद मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर रामकृष्ण प्रसाद सिंग म्हणाले की 2024 पर्यंत 5 ट्रिलीयनची अर्थव्यवस्था गाठण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरविलेले ध्येय साध्य करण्यात पोलाद मंत्रालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. रामकृष्ण प्रसाद सिंग यांनी यावेळी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली.
रामकृष्ण प्रसाद सिंग राज्यसभेत बिहार राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि ते भारतीय प्रशासन सेवेतील माजी अधिकारी आहेत.
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733763)
Visitor Counter : 301