PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 06 JUL 2021 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 6 जुलै 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 35.75 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासांत भारतात कोविडचे 34,703 नवे रुग्ण आढळले आहेत, गेल्या 111 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या

भारतातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ती 4,64,357 इतकी झाली आहे, गेल्या 101 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या

सध्या एकूण रुग्णांच्या प्रमाणात उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1.52% इतके आहे

आतापर्यंत देशभरात एकूण 2,97,52,294 जण कोविडमुक्त झाले आहेत

गेल्या 24 तासांत 51,864 जण कोविडमुक्त झाले आहेत

दैनंदिन रुग्णसंख्येपेक्षा दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग 54 व्या दिवशी अधिक

रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण 97.17% पर्यंत वाढले आहे.

साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून, सध्या तो 2.40% इतका आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हीटीचा दर 2.11% वर आला असून सलग 15  दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी

देशात कोविड चाचण्यांची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे- आतापर्यंत एकूण 42.14 कोटी चाचण्या करण्यात आल्या

इतर अपडेट्स :

  • भारताच्या एकूण लसीकरण मोहिमेने, आज सकाळी सात वाजता आलेल्या तातपुरत्या आकडेवारीनुसार, 35.75 कोटी (35,75,53,612) मात्रांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत वर्ष 18 ते 44 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 10.57 कोटींपेक्षा (10,57,68,530) अधिक लसी देण्यात आल्या.
  • देशभरातल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली आहे. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना दिली आहे जेणेकरुन ते लसीकरणाचे अधिक उत्तम नियोजन करु शकतील आणि लसींची पुरवठा साखळी  सुरळीत राखता येईल.
  • मागील दोन दिवसात राजस्थानमध्ये कोविड 19 लसीचा तुटवडा असल्यामुळे काही कोविड लसीकरण केंद्र बंद करावी लागली असा आरोप माध्यमातील काही वृत्तात करण्यात आला आहे. हे स्पष्ट करण्यात येत आहे की जुलै 2021 च्या महिन्यात राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना तसेच खासगी क्षेत्रातील रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या लसींच्या एकूण मात्रांबाबत पुरेशी माहिती अगोदरच देण्यात आली होती. कोविड लसींच्या उपलब्धतेनुसार कोविड 19 लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याची सूचना राज्यांना करण्यात आली होती

महाराष्ट्र अपडेट्स :-

महाराष्ट्रात कोविड -19 च्या 6,740 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या  61,04,917 वर गेली आहे, तर 51  नवीन मृत्यूंमुळे मृतांचा आकडा 1,23,136  झाला आहे. रविवारच्या तुलनेत राज्यात काल दैनंदिन  कोविड  रुग्ण  आणि मृत्यूंमध्ये घट झाली आहे. रविवारी 9,336 ने रुग्ण आणि  123  मृत्यूची नोंद झाली होती.  गेल्या 24 तासांत 13,027 रूग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले . त्यामुळे  बरे झालेल्या रुग्णांची संख्या, 58,61,720  वर पोहचली आहे. राज्यात आता 1,16,827  सक्रिय रुग्ण  आहेत.

गोवा अपडेट्‌स:-

गोव्यात कोरोना बाधितांची संख्या  सोमवारी 130 ने वाढली आणि 1,67,566 वर गेली.  तर  दोन मृत्यू झाले आणि 130 लोकांना घरी सोडण्यात आले . राज्यात मृतांची संख्या 3,075 आहे आणि बरे झालेल्यांची  संख्या 1,67,566. इतकी असून 1,934 सक्रिय रुग्ण आहेत .

M.Chopade/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1733203) Visitor Counter : 122