रेल्वे मंत्रालय
सप्टेंबर 2020 ते जून 2021 या कालावधीत सलग 10 महिन्यांमध्ये रेल्वेने केली विक्रमी मालवाहतूक
जून 2021 मध्ये भारतीय रेल्वेला मालवाहतुकीच्या माध्यमातून प्राप्त झालेली 11186.81 कोटी रुपयांची मिळकत जून 2020 च्या तुलनेत 26.7% जास्त
Posted On:
02 JUL 2021 5:48PM by PIB Mumbai
कोविडची आव्हाने असूनही जून 2021 महिन्यात मालवाहतूकीतून प्राप्त होणारी मिळकत आणि मालवाहतुकीच्या संदर्भातील आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेची उच्च गती कायम आहे.
मिशन मोडमध्ये, भारतीय रेल्वेने 2021 च्या जून महिन्यात, 112.65 दशलक्ष टन मालवाहतूक केली, जी जून 2019 च्या (101.31 दशलक्ष टन) तुलनेत 11.19% जास्त आहे, 2019 हे सामान्य वर्ष होते आणि याच कालावधीतील ही मालवाहतूक जून 2020 च्या (93.59 दशलक्ष टन) तुलनेत 20.37% जास्त होती.
जून, 2021 मध्ये वाहतूक केलेल्या महत्वाच्या वस्तूंमध्ये 50.03 दशलक्ष टन कोळसा, 14.53 दशलक्ष टन लोह धातू, 5.53 दशलक्ष टन कच्चे लोखंड आणि
तयार पोलाद, 5.53 दशलक्ष टन खाद्यान्न, 4.71 दशलक्ष टन खते, 3.66 दशलक्ष टन खनिज तेल, 6.59 दशलक्ष टन सिमेंट (पक्क्या विटा वगळून) आणि 4.28 दशलक्ष टन पक्क्या विटा यांचा समावेश आहे.
2021 च्या जूनमध्ये, भारतीय रेल्वेला मालवाहतुकीच्या माध्यमातून 11186.81 कोटी रुपयांची झालेली मिळकत जून 2020 (8829.68 कोटी ) च्या तुलनेत 26.7% जास्त आणि जून 2019 च्या (10707.53 कोटी ) तुलनेत 4.48 % जास्त आहे.
याचा इथे उल्लेख करवा लागेल की, रेल्वे मालवाहतूक अत्यंत आकर्षक करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून बऱ्याच सवलती/सूटही दिली जात आहे.
हे नमूद करायला हवे की, रेल्वेच्या विद्यमान जाळ्यामध्ये मालगाड्यांची गती वाढविण्यात आली आहे.
मालगाड्यांचा वेग वाढल्यामुळे सर्व भागधारकांच्या खर्चाची बचत होते. गेल्या 19 महिन्यांत मालवाहतुकीचा वेग दुपटीने वाढला आहे.
कोविड19 संकटाच्या काळाचे भारतीय रेल्वेने सर्वांगीण कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारण्याच्या संधीच्या रूपात परिवर्तन केले आहे.
***
S.Tupe/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732304)
Visitor Counter : 212