अर्थ मंत्रालय

कोविड-19 महामारीशी लढा देण्यात सीबीआयसीने केलेल्या प्रयत्नांचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून कौतुक; गेल्या काही काळात झालेले वाढीव महसूल संकलन ‘न्यू नॉर्मल’ बनायला हवे: अर्थमंत्री

Posted On: 01 JUL 2021 8:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2021

 

जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याला आज चार वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्त देशात विविध आर्थिक संस्था जीएसटी दिन साजरा करत आहेत. केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ-सीबीआयसीच्या सर्व कार्यालयातही यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम डिजिटल माध्यमातून घेण्यात आला. गेल्या आठ महिन्यात, जीएसटी सह महसूल संकलनाही वाढ झाली असून, त्याचा लाभ आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत होत आहे.

देशातील 54,000 वैयक्तिक जीएसटी करदात्यांनी देशाच्या उभारणीत दिलेल्या योगदानाची योग्य दखल घेतल्याबद्दल, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सीबीआयसीचे कौतुक केले आहे. कोविड महामारीच्या काळात, करदात्यांना विविध सुविधा देण्यात आल्या, ज्यात दोन मोठ्या आर्थिक पैकेजसह, विलंब शुल्कात सवलत, व्याजदारात कपात, मुदतवाढ आणि परताव्यांची मोहीम राबवून करदात्यांच्या हातात पैसा राहील अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजनांचा समावेश आहे. तसेच कोविड संबंधी औषधे, उपचार आणि लसी यावरील जीएसटी दरातही सरकारने कपात केली आहे.

या काळात, सीबीआयसीच्या 189 कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले, त्याबद्दल शोकसंवेदना व्यक्त करत, देशाप्रती त्यांनी दिलेल्या योगदानाबाबत सीतारामन यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या स्मरणार्थ, ‘श्रद्धांजली’ या पुस्तकाचे प्रकाशन सीबीएससी ने केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. जीएसटी प्रशासनात उल्लेखनीय योगदान देण्याबद्दल, ज्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली, त्यांचेही सीतारामन यांनी अभिनंदन केले.

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1732042) Visitor Counter : 274