पंतप्रधान कार्यालय
के. व्ही. संपत कुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
30 JUN 2021 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सुधर्म ' या संस्कृत दैनिकाचे संपादक के. व्ही. संपत कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "के. व्ही. संपत कुमार हे एक प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी खासकरुन तरुणांमध्ये संस्कृतचे संवर्धन आणि ते लोकप्रिय करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांची आवड आणि निर्धार प्रेरणादायक होता. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय आणि प्रशंसकांप्रति शोक संवेदना. ओम शांती. "
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731717)
अभ्यागत कक्ष : 280
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam