रसायन आणि खते मंत्रालय

केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि जी. किशन रेड्डी यांनी आज हैदराबादमधील लस निर्मितीचा घेतला आढावा

Posted On: 27 JUN 2021 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2021

 

केंद्रीय रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज हैदराबाद येथे सुरु असलेल्या लस उत्पादनाचा आढावा घेण्यासाठी भारत बायोटेकच्या लस उत्पादन केंद्राला आणि बायो सेफ्टी लेव्हल -3 सुविधेला भेट दिली. यावेळी औषध प्रशासन विभाग सचिव, श्रीमती  एस. अपर्णा यादेखील उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना मनसुख मांडवीय म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सरकार सर्व लस विकासक आणि उत्पादक यांना पाठबळ देण्यास कटीबद्ध आहे आणि सर्वांना लस मिळेल हे सुनिश्चित करत आहे.

दोन्ही मंत्र्यांनी उत्पादकांशी लसींचे उत्पादन वाढवण्यासंदर्भातही चर्चा केली.

 

 

* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1730748) Visitor Counter : 236