आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने पार केला 32 कोटी मात्रांचा महत्वाचा टप्पा


गेल्या 24 तासात लसीच्या 64.25 लाख मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासात भारतात 50,040 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 5,86,403 पर्यंत घसरली

सलग 45 व्या दिवशी कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या नव्या दैनंदिन रुग्णांपेक्षा अधिक

कोरोनातून बरे होण्याचा दर वाढून 96.75%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.82%, हा दर सलग 20 व्या दिवशी 5% च्या खाली

Posted On: 27 JUN 2021 2:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2021

 

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, लसीच्या एकूण 32 कोटींहून अधिक मात्रा देऊन भारताने एक महत्वाचा टप्पा ओलांडला आहे. 

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या माहितीनुसार, 42,79,210 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून लसीच्या एकूण 32,17,60,077 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात लसीच्या 64,25,893 मात्रा देण्यात आल्या.

यांचा  यात समावेश आहे :

HCWs

1st Dose

1,01,96,091

2nd Dose

72,00,994

FLWs

1st Dose

1,74,36,514

2nd Dose

93,79,246

Age Group 18-44 years

1st Dose

8,34,29,067

2nd Dose

18,56,720

Age Group 45-59 years

1st Dose

8,68,82,578

2nd Dose

1,46,35,430

Over 60 years

1st Dose

6,74,40,309

2nd Dose

2,33,03,128

Total

32,17,60,077

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या  नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

भारतात गेल्या 24 तासात  50,040 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

सलग 20 व्या दिवशी दैनंदिन नव्या कोविड रुग्णांची संख्या 1 लाखाच्या खाली नोंदविण्यात आली. केंद्र आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित  प्रयत्नांचा हा  परिणाम आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001O42U.jpg

भारतात सक्रिय रुग्ण संख्येतही सातत्याने घट होताना दिसत आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या आज 5,86,403 आहे.

गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णसंख्येत 9,162 रुग्णांची निव्वळ घट झाली असून देशात नोंद झालेल्या एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण आता केवळ 1.94%  आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0023F3K.jpg

बहुतांश लोक कोविड -19 संसर्गातून  बरे होत आहेत, भारतात सलग 45 दिवस  दैनंदिन नवीन कोरोना रुग्णांपेक्षा दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.गेल्या 24 तासात  57,944 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात नोंदविण्यात आलेल्या दैनंदिन रुग्ण संख्येच्या तुलनेत सुमारे 8 हजार (7,904) अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0034R1I.jpg

महामारीच्या सुरूवातीपासूनच संक्रमित लोकांपैकी, 2,92,51,029 जण यापूर्वीच कोविड--19 मधून बरे झाले आहेत.आणि गेल्या 24  तासात 57,944 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण 96.75% असून हे प्रमाण सतत वाढीचा कल दर्शवत आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0048K9V.jpg

संपूर्ण देशभरात चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून  गेल्या 24 तासांत देशात एकूण 17,77,309 चाचण्या करण्यात आल्या.भारतात आतापर्यंत एकूण 40.42 कोटी  (40,42,65,101) चाचण्या करण्यात आल्या  आहेत.

देशभरात एकीकडे चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे साप्ताहिक रुग्णसंख्येत  सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.91% आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज  2.82% असून गेले सलग 20 दिवस हा दर 5% पेक्षा कमी राहिला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005IAOV.jpg

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730687) Visitor Counter : 205