निती आयोग

मातृत्व, किशोर आणि बालपणातला लठ्ठपणा रोखण्यासंदर्भात नीती आयोगाने घेतली राष्ट्रीय परिषद

Posted On: 25 JUN 2021 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जून 2021

 

मातृत्व, किशोर आणि बालपणातला लठ्ठपणा रोखण्यासंदर्भात नीती आयोगाने राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल या परिषदेच्या अध्यक्षस्थानी तर भारतीय पोषण संस्थेच्या संचालक डॉ आर हेमलता परिषदेच्या सह अध्यक्ष होत्या.

लठ्ठपणा ही ‘मूक महामारी’ असल्याचे नीती आयोगाचे अतिरिक्त सचिव (आरोग्य आणि पोषण) डॉ राकेश सरवाल यांनी सांगितले. जागतिक स्तरावरचे तज्ञ, संयुक्त राष्ट्र संस्थांमधले प्रतिनिधी, केंद्रीय मंत्रालये आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांनी, लठ्ठपणा वाढत असल्याचे वास्तव निदर्शनाला आणून दिले आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठीच्या उत्तम प्रथा सादर केल्या.

लठ्ठपणा रोखण्यासाठी अन्न आधारित सामाजिक सुरक्षा जाळ्यात वैविध्य आणण्याच्या गरजेवर यावेळी भर देण्यात आला. लठ्ठ व्यक्ती या अनारोग्य असलेल्या लोकसंख्येचा भाग असतात.

आरोग्यदायी वर्तनाचा अंगीकार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासंदर्भात, आयुष मंत्रालय सचिव आणि युवा विभागाने  सूचना मांडल्या. अनुकूल धोरण आणि वर्तनात्मक परिवर्तनाची आवश्यकता यावर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय,मनुष्यबळ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. युनिसेफच्या देशातल्या प्रतिनिधीनेही त्याला दुजोरा दिला.

या प्रश्नाची प्राधान्याने दखल घेण्याची आवश्यकता यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केली . शारीरिक हालचाल,आरोग्यदायी आहार आणि जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याबाबत व्यापक जन संवादावरही भर देण्यात आला. लठ्ठपणाच्या आव्हानावर मात करण्यासाठी संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाज या  दृष्टीकोनाचा अवलंब करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

किशोरवयीन वर्गाला समोर ठेवून शारीरिक हालचाल आणि आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणाऱ्या बहु-क्षेत्रीय दृष्टीकोनाचे आवाहन डॉ पॉल यांनी केले.   

 

* * *

S.Tupe/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730288) Visitor Counter : 193