शिक्षण मंत्रालय

संजय धोत्रे यांनी जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला आणि शिक्षण मंत्री आणि कामगार व रोजगार मंत्र्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले


संजय धोत्रे यांनी शैक्षणिक असमानता दूर करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला

Posted On: 23 JUN 2021 6:39PM by PIB Mumbai

 

शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे 22 जून 2021 रोजी  जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. इटलीने ही बैठक आयोजित केली होती. जी-20 शिक्षण मंत्र्यांनी शैक्षणिक दारिद्र्य आणि असमानतेविरूद्धच्या लढ्यात विशेषत: कोविड 19 महामारी संदर्भात कशी  प्रगती करावी याविषयी आपले विचार मांडले. मिश्र शिक्षणाद्वारे शिक्षणातील सातत्य आणि गुणवत्ता सुनिश्चित  करण्यासाठी महामारी दरम्यान राबवलेले अभिनव अनुभव सामायिक करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

भारताचे प्रतिनिधित्व करत संजय धोत्रे यांनी शैक्षणिक दारिद्र्य, असमानता आणि लवकर शाळा सोडण्याची समस्या दूर करण्याबाबत  देशाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,  2020 बाबत  बोलताना ते म्हणाले की यामध्ये सर्वांना न्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षणाची कल्पना मांडली असून     सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गटांमधील मुलांवर आणि तरूणांवर, विशेषत: मुलींवर, ज्या मागे राहण्याचा धोका जास्त आहे अशांवर विशेष भर देण्यात आला  आहे.

धोत्रे म्हणाले की, भारतीय शिक्षण व्यवस्थेने  अनेक हस्तक्षेपांद्वारे शिक्षणाच्या सर्व स्तरांमधील लिंग आणि सामाजिक श्रेणीतील तफावत  दूर करण्यासाध्य दिशेने निरंतर प्रगती केली आहे. यापैकी काही उपायांमध्ये  शाळांची क्षमता वाढवणेशाळा सोडलेल्या  मुलांचा शोध  घेणे; असुरक्षित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  निकालांवर लक्ष ठेवणे; बाल हक्कांच्या उल्लंघनाविरोधात शारीरिक सुरक्षा आणि शून्य सहिष्णुता सुनिश्चित करणे; मुलांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी माध्यान्ह भोजन ; विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी यंत्रणा सक्षम करणे; मुक्त आणि दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांद्वारे  शिकण्यासाठी आणि त्याला बळकटी देण्यासाठी विविध  मार्गांना प्रोत्साहन देणे  यांचा समावेश आहे. .

महामारीच्या काळात  शैक्षणिक सातत्य सुनिश्चित करण्याबाबत, त्यांनी सांगितले की भारताने मिश्र शिक्षणाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आहे. डिजिटल शैक्षणिक सामग्री दीक्षा , स्वयम आणि इतर विविध ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे जी कोणत्याही वेळी आणि कोठेही विनामूल्य पाहता येईल.

धोत्रे म्हणाले की, शैक्षणिक दारिद्र्य, असमानता आणि लवकर शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी जी-20 देशांच्या सामूहिक प्रयत्नांना भारताचे समर्थन आहे.  शिक्षणातील सातत्य सुनिश्चित करण्यासाठी महामारी दरम्यान आलेल्या अनुभवांच्या आधारे  जी-20 देशांच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आणखी सुधारणा आणि बळकटी देण्याला भारताचा पाठिंबा आहे.

जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या घोषणापत्रासाठी  येथे क्लिक करा

जी-20  शिक्षण आणि कामगार आणि रोजगार मंत्र्यांच्या संयुक्त घोषणापत्रासाठी  येथे क्लिक करा

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1729823) Visitor Counter : 223