आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 29 कोटींचा टप्पा


देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 50,848 नवे रुग्ण

देशात उपचाराधीन रुग्णसंख्येचा उतरता आलेख जारी राखत 6,43,194 या 82 दिवसातल्या सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्येची नोंद

सलग 41 व्या दिवशी दैनंदिन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

रुग्ण बरे होण्याचा दर 96.56%

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.67%, सलग 16 व्या दिवशी पॉझीटीव्हिटी दर 5% कमी

Posted On: 23 JUN 2021 4:53AM by PIB Mumbai

 

आणखी एका महत्वाच्या घडामोडीत, कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये भारताने काल 29 कोटीचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 39,49,630 सत्रांद्वारे 29,46,39,511 मात्रा देण्यात आल्या आहेत.गेल्या 24 तासात 54,24,374 मात्रा देण्यात आल्या.

 

यामध्ये समावेश आहे-

 

HCWs

1st Dose

1,01,45,382

2nd Dose

71,14,021

FLWs

1st Dose

1,72,70,889

2nd Dose

91,37,511

Age Group 18-44 years

1st Dose

6,59,41,855

2nd Dose

14,28,117

Age Group 45-59 years

1st Dose

8,28,91,130

2nd Dose

1,31,57,562

Over 60 years

1st Dose

6,56,45,248

2nd Dose

2,19,07,796

Total

29,46,39,511

 

21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा  टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. गेल्या 24 तासात 50,848 नव्या रुग्णांची नोंद झाली.

सलग 16 व्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.  केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिपाक आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0016AIA.jpg

देशात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे. आज उपचाराधीन रुग्णांची संख्या 6,43,194 होती. 82 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020R17.jpg

कोविड-19 मधून अधिकाधिक  रुग्ण बरे होत असल्याने सलग 41 व्या दिवशी दैनंदिन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 68,817 रुग्ण कोरोना मुक्त झाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003YGJZ.jpg

महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 2,89,94,855 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 96.56% असून याचा आलेख चढता आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004G02Z.jpg

देशाच्या कोरोना चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ होत असून गेल्या 24 तासात 19,01,056 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत 39.59 कोटी (39,59,73,198) चाचण्या करण्यात आल्या.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005HEAM.jpg

देशात चाचण्या वाढवण्यात आल्या असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सातत्याने खाली येत आहे. सध्या साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 3.12% आणि आज दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.67% आहे. सलग 16 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी आहे.

***

S.Tupe/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1729759) Visitor Counter : 300