संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दलासाठी दोन प्रदूषण नियंत्रण जहाजांच्या बांधकामासंदर्भात संरक्षण मंत्रालयाचा जीएसएलसोबत करार

Posted On: 22 JUN 2021 5:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जून 2021

 

संरक्षण मंत्रालयाने गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) यांच्याशी भारतीय तटरक्षक दलासाठी (आयसीजी) लागणाऱ्या रुपये 583 कोटी रकमेच्या दोन प्रदूषण नियंत्रक जहाजांच्या (पीसीव्हीज्) बांधकामासंदर्भात 22 जून 2021 रोजी करार केला आहे. स्वदेशी पद्धतीची रचना असलेली ही विशेष  जहाजे गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या वतीने विकसित केली जातील. हे संरक्षण सामुग्री बाबत स्वदेशी पद्धतीने रचानात्मक, विकसित आणि उत्पादित (बाय इंडियन – आयडीडीएम)`  धोरणानुसार केले आहे.  संरक्षण खरेदीसाठी ही सर्वोच्च प्राधान्य श्रेणी आहे. ही  जहाजे समुद्रातील तेल गळती विषयक आपत्तींना प्रतिसाद देऊन भारतीय तटरक्षक दलाची कार्यक्षमता वाढवतील. ही दोन जहाजे अनुक्रमे नोव्हेंबर 2024 आणि मे 2025 मध्ये मिळतील असे नियोजन आहे.

सध्या, भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात मुंबई, विशाखापट्टणम् आणि पोरबंदर येथे प्रदूषणावर लक्ष ठेवणे, तेल गळतीवरील निरीक्षण / प्रतिसाद कार्यपद्धती यासाठी भारतीय ईईझेड आणि आसपासच्या बेटांवर समर्पित तीन प्रदूषण नियंत्रक जहाजे आहेत. नवीन नियोजित प्रदूषण नियंत्रक जहाजे ही पूर्वेकडील आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या अंदमान आणि निकोबार विभागातील  आवश्यकतांसाठी आहेत. या जहाजात हेलिकॉप्टर वापर क्षमतेसह, अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये  सज्ज असतील, ज्यामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन काम करणाऱ्या सूक्ष्म तांत्रिक उपकरणांचा समावेश असेल, ज्याद्वारे जहाजातून गळती होणारे तेल गोळा करणे आणि पसरणारे तेल नष्ट करण्याची क्षमता देखील असेल.  

आत्मनिर्भर भारत अभियानातील उद्दिष्टांची पूर्तता करताना, या करारामुळे स्वदेशी जहाज बांधणीची क्षमता वाढेल आणि जहाज बांधणी क्षेत्रात सुमारे 200 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत विक्रेत्यांचा रोजगार उपलब्ध होईल.

 

* * *

M.Iyengar/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1729430) Visitor Counter : 177