आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण: गैरसमज विरुद्ध वस्तुस्थिती


कोविड-19 लसीकरणामुळे महिला किंवा पुरुषांमधे वंध्यत्व निर्माण होत असल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे आढळलेले
नाहीत

NEGVAC ने सर्व स्तनदा मातांसाठी कोविड-19 लसीकरणाची केली आहे शिफारस

Posted On: 21 JUN 2021 7:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2021

 

प्रजननक्षम वयोगटातील लोकांमधे कोविड -19 लसीकरणामुळे वंध्यत्व येत असल्याच्या चिंता व्यक्त करणाऱ्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून, परिचारिकांसह आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर कार्यरत कर्मचाऱ्यांच्या गटात विविध प्रकाराच्या अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींचा प्रसार होत असल्याचे या वृत्तात अधोरेखित केले आहे.  अशा प्रकारच्या अफवा आणि चुकीच्या माहीतीचा प्रसार याआधीही पोलिओ आणि  गोवर लसीकरणावेळीही पाहायला मिळाला होता.  

केन्द्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने  (MoHFW) प्रश्नांचे निरसन करणाऱ्या संकेतस्थळावर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (https://www.mohfw.gov.in/pdf/FAQsforHCWs&FLWs.pdf

उपलब्ध असलेल्या कोणत्याही लसी प्रजननावर परिणाम करत नाहीत. या लसींचे कोणते विपरित परिणाम तर होत नाहीत ना याची खातरजमा करण्यासाठी सर्व लसींची आधी प्राण्यांवर आणि नंतर माणसांवर चाचणी केली जाते. सुरक्षा आणि परिणामकारकतेच्या कसोटीवर उतरल्यावरच लसीला मान्यता दिली जाते.

या शिवाय, कोविड-19 लसीकरणामुळे वंध्यत्व येण्याबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी केन्द्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. 

कोविड-19 लसीकरणामुळे पुरुष किंवा महिलांमधे वंध्यत्व येते असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.  या लसी पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहेत.  

सर्व स्तनदा मातांसाठी कोविड -19 प्रतिबंधक लस सुरक्षित आहे. लसीकरणा आधी किंवा नंतर स्तनपान थांबवण्याची गरज नाही असे स्पष्ट करत, लसीकरण व्यवस्थापनाची संदर्भातील राष्ट्रीय तज्ञ गटाने (NEGVAC) लसीकरणाची शिफारस केली आहे. 


* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1729153) Visitor Counter : 277