उपराष्ट्रपती कार्यालय
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
20 JUN 2021 6:57PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती श्री. एम. व्यंकय्या नायडू यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे –
“योग एक दिवा आहे, जो एकदा प्रज्वलित झाला की त्याचे तेज कधीच कमी होत नाही.
तुमचा सराव जितका चांगला असेल तितकी तुमची ज्योत उजळेल”.
- बी.के.एस. अय्यंगार
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण दररोज योगाभ्यास करून आपले जीवन शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या उज्वल करण्याचा संकल्प करूया.
महामारीने सर्व जगाला सर्वांगीण आरोग्य कल्याणाचे महत्व पटवून दिले आहे. आणि योग हा एक सोपा परंतु सामर्थ्यशाली सराव आहे जो आपल्यातला कणखरपणा वाढविण्यासाठी मदत करतो आणि आपले आरोग्य सर्वांगीण सुधारतो. योगाभ्यास, भारताने मानवतेला दिलेली देणगी असून जगभरातील कोट्यवधी लोकांचे जीवन बदलत आहे, याचा मला अतिशय आनंद होतो.
***
S.Thakur/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728823)
Visitor Counter : 290