आयुष मंत्रालय

आंतरराष्ट्रीय योग दिन 2021: 21 जून 2021 रोजी दूरदर्शनवरून प्रसारित केले जाणारे पंतप्रधानांचे भाषण हे योग दिन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण


डिजिटल क्रांतीचा परिणाम, आणखी एक योग दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण जग सज्ज

Posted On: 19 JUN 2021 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2021

 

कोविड -19 महामारी  आणि सामूहिक  उपक्रमांवरचे निर्बंध लक्षात घेता आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 चा  प्रमुख कार्यक्रम दूरदर्शनवरून प्रसारित केले जाणारे  पंतप्रधानांचे भाषण असून ते  मुख्य आकर्षण असेल. सर्व दूरदर्शन वाहिन्यांवरून सकाळी 6.30 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात आयुष राज्यमंत्री  किरेन रिजिजू यांचे भाषण आणि मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगाद्वारे योगासनांचे थेट प्रसारण  समाविष्ट असेल.

सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन अशा वेळी येत आहे  जेव्हा जग कोविड -19 चा सामना करत आहे.  गेल्या काही आठवड्यांपासून डिजिटल मंचावर सुरु असलेली लगबग पाहता महामारीमुळे योगदिनाविषयीचा  उत्साह किंचितही कमी झाला नसल्याचे दिसत आहे. आयडीवाय चे नोडल मंत्रालय आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय योग दिनाची पूर्वतयारी म्हणून  आयोजित केलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून निरामय आरोग्यासाठी योगाची  महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.  आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 ची मुख्य संकल्पना  "निरामय आरोग्यासाठी योग" आहे जी सध्याच्या चिंताजनक वातावरणाशी सुसंगत आहे. महामारीमुळे लादलेले निर्बंध असूनही मंत्रालयाने जवळपास  1000 अन्य हितधारक संस्थांबरोबर आयोजित केलेल्या असंख्य डिजिटल उपक्रमांमुळे योगसाधना लोकांपर्यंत पोहोचली आहे.  परदेशात भारतीय दूतावास  21 जूनची पूर्वतयारी म्हणून  विविध उपक्रमांविषयी आपापल्या देशांमध्ये समन्वय साधत आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार जगभरातील सुमारे 190  देशांमध्ये योग दिन साजरा केला जाईल.

आंतरराष्ट्रीय योग दिनाने इतक्या  वर्षांमध्ये केवळ योगसाधनेची लोकप्रियताच वाढवली नाही तर  अनेक नवीन प्रांतांमध्ये त्याचा अवलंब करण्यासाठी प्रेरित करून त्याचे  भौगोलिक अस्तित्व देखील वाढवले.

महामारीच्या अनुभवाने योगाभ्यासामुळे आरोग्यासाठी असलेल्या लाभांबाबत लोकांना  अधिक जागरूक केले आहे आणि आयुष मंत्रालयाने त्यांच्या प्रचाराच्या प्रयत्नांमध्ये या अनुभवाला योग्य स्थान दिले  आहे. कोविड -19 संबंधी मार्गदर्शक सूचनांमध्ये रोग प्रतिकारशक्ती  वाढविण्यासाठी आणि कोविड -19 चा सामना  करण्यासाठी  नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले आहे .

मागील वर्षांप्रमाणे, 21 जून 2021 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना  सकाळी 7.00 वाजता  मोठ्या संख्येने लोक सहभागी होऊन योगविद्येची प्रात्यक्षिके दाखवतील. त्यानंतर कॉमन  योग प्रोटोकॉल (सीवायपी)हा  जवळपास 45 मिनिटांचा योगाभ्यास कार्यक्रम  होईल.

योगासनानंतर  पंतप्रधानांचे भाषण होईल ते  सकाळी 7:00 ते  7:45  पर्यंत चालेल.  हे थेट योगसाधना प्रात्यक्षिक झाल्यानंतर 15 आध्यात्मिक नेते आणि योग गुरुंचे संदेश दाखवले जातील.


* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728585) Visitor Counter : 211