पर्यटन मंत्रालय

भारतात एमआयसीई उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या राष्ट्रीय धोरण आणि पथदर्शी आराखड्याच्या मसुद्यावर पर्यटन मंत्रालयाने मागवल्या प्रतिक्रिया


भारतात ग्रामीण पर्यटनाच्या विकासासाठी राष्ट्रीय धोरण आणि पथदर्शी आराखड्याच्या मसुद्यावर पर्यटन मंत्रालयाने मागवल्या प्रतिक्रिया

वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटन यासाठीच्या राष्ट्रीय धोरण आणि पथदर्शी आराखड्याच्या मसुद्यावर पर्यटन मंत्रालयाने मागवला प्रतिसाद आणि सूचना

मंत्रालयाकडे 30 जून 2021 पर्यंत सूचना पाठवता येणार

Posted On: 18 JUN 2021 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2021

पर्यटन मंत्रालयाने एमआयसीई,अर्थात बैठका,प्रोत्साहन, परिषदा आणि प्रदर्शन   उद्योगाची अपार क्षमता  जाणून पर्यटनाच्या या विभागाच्या प्रोत्साहन आणि विकासासाठी काम सुरु केले आहे. एमआयसीई उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने  राष्ट्रीय धोरण आणि पथदर्शी आराखड्याचा  मसुदा तयार केला असून पर्यटन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर https://tourism.gov.in/  ‘व्हाटस न्यू’ विभागात तो उपलब्ध आहे.

https://tourism.gov.in/sites/default/files/202106/Draft%20Strategy%20for%20MICE%20tourism%20June%2012.pdf

आत्मनिर्भर भारतासाठीच्या उपक्रमांतर्गत ग्रामीण पर्यटन विकासासाठी,पर्यटन मंत्रालयाने, राष्ट्रीय धोरण आणि पथदर्शी आराखड्याचा मसुदा तयार केला आहे. व्होकल फॉर लोकल अंतर्गत  स्थानिक वस्तूंना प्रोत्साहन देण्याचा हा  मंत्र घेऊन ग्रामीण पर्यटन आत्मनिर्भर भारत अभियानांमध्ये महत्वाचे योगदान देऊ शकते.  ग्रामीण पर्यटन विकासासाठीचा राष्ट्रीय धोरण आणि पथदर्शी आराखड्याचा  मसुदा तयार केला असून  पर्यटन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर https://tourism.gov.in/  ‘व्हाटस न्यू’ विभागात तो उपलब्ध आहे.

https://tourism.gov.in/sites/default/files/202106/Draft%20Strategy%20for%20Rural%20Tourism%20June%2012.pdf

आरोग्य देखभाल आणि पर्यटन हे जगातले वेगाने वाढणारे उद्योग क्षेत्र आहे.या उद्योगांच्या मिलाफाने  वैद्यकीय मूल्य प्रवास, एमव्हीटीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी गेली काही वर्षे भारत हे उत्कृष्ट स्थान ठरत आहे. आयुष द्वारे पारंपारिक उपचार पद्धतीवर लक्ष केंद्रित करत,योग आणि तंदुरुस्ती यासाठी भारत हे लोकप्रिय स्थान ठरले आहे. पर्यटन मंत्रालयाने एमव्हीटीची मोठी क्षमता जाणून घेत वैद्यकीय पर्यटन विकास आणि प्रोत्साहन या दिशेने काम सुरु केले आहे. यासाठी पर्यटन मंत्रालयाने राष्ट्रीय धोरण आणि पथदर्शी आराखड्याचा  मसुदा तयार केला असून  पर्यटन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर https://tourism.gov.in/  ‘व्हाटस न्यू’ विभागात तो उपलब्ध आहे.        

https://tourism.gov.in/sites/default/files/202106/Draft%20Strategy%20for%20Medical%20and%20Wellness%20Tourism%20June%2012.pdf

मसुद्याला अंतिम रूप देण्यापूर्वी आणि मसुदा समावेशक राहावा यासाठी या तिन्ही राष्ट्रीय धोरण आणि पथदर्शी आराखड्यासाठी प्रतिक्रिया,सूचना मागवल्या आहेत. 30 जून 2021 पर्यंत पर्यटन मंत्रालयाच्या js.tourism[at]gov[dot]in, bibhuti.dash72[at]gov[dot]in, prakash.om50[at]nic[dot]in या ई मेल आयडी वर या सूचना आणि  प्रतिक्रिया  पाठवता येतील.

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728298) Visitor Counter : 146