भारतीय निवडणूक आयोग

सार्वत्रिक निवडणुका 2019 चा अ‍ॅटलस निवडणूक आयोगाकडून जारी

Posted On: 18 JUN 2021 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2021

'सार्वत्रिक निवडणुका 2019- अ‍ॅटलस', मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी राजीव कुमार, अनुप चंद्र पांडे या निवडणूक आयुक्तांसह 15 जून 2021 ला जारी केला. या  अभिनव दस्तावेजाचे संकलन केल्याबद्दल आयोगाच्या अधिकाऱ्यांची सुशील चंद्रा यांनी प्रशंसा केली आणि अभ्यासक तसेच संशोधकांना भारतीय निवडणुकांचे व्यापक चित्र उलगडण्यासाठी हा दस्तावेज प्रेरित करेल असे ते म्हणाले.

या अ‍ॅटलसमध्ये निवडणुकी संदर्भात सर्व डाटा आणि सांख्यिकी तपशील आहे. निवडणुकीसंदर्भात रंजक माहिती, घटना आणि कायदेशीर तरतुदीची माहितीही यामध्ये आहे.

1951-52 च्या पहिल्या निवडणुकीपासून आयोग सांख्यिकी आणि विवारणात्मक डाटा असलेलेल पुस्तक प्रकाशित करत आहे. 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका या मानवी इतिहासातल्या सर्वात मोठ्या लोकशाही निवडणुका होत्या ज्यामध्ये भारताच्या 10.378 लाख मतदान केंद्रांवर 61.468 कोटी मतदार  सहभागी झाले.

भारतीय निवडणुकीत, निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडून, मतदार याद्या तयार करताना आणि निर्वाचन अधिकाऱ्यांकडून निवडणूक प्रक्रिया सुरु असताना  निवडणूक विषयक डाटा प्रामुख्याने जमा केला जातो.

ऑक्टोबर 2019 मध्ये आयोगाने 543 लोकसभा मतदार संघांच्या निर्वाचन अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेल्या निवडणूक डाटा वर आधारित सांख्यिकी अहवाल जारी केला. या अ‍ॅटलसमध्ये देण्यात आलेले नकाशे आणि तक्ते यामध्ये ही माहिती दर्शवण्यात आली असून यातून देशाचे निवडणूक वैविध्य जाणण्यासाठी मदत होते.

यामध्ये काही वैशिष्ट्येही नोंदवण्यात आली आहेत. यात, महिला मतदारांनी केलेल्या मतदानाची टक्केवारी पुरुष मतदारांपेक्षा जास्त असलेल्या 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातली आकडेवारी देण्यात आली आहे. मतदार, उमेदवार यासह अन्य मापदंडाच्या आधारावर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या लोकसभा मतदार संघाबाबत यामध्ये माहिती देण्यात आली आहे.  विविध वयोगटातले मतदार, मतदारांमध्ये स्त्री-पुरुष प्रमाण यासारखे तुलनात्मक तक्तेही विविध श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

1951 पासूनच्या सार्वत्रिक निवडणुकात निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या संख्येची तुलनाही या दस्तावेजात करण्यात आली आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत, देशभरात 11692 उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अर्ज मागे आणि फेटाळण्यात आल्यानंतर 8054 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

https://eci.gov.in/ebooks/eci-atlas/index.html इथे ई अ‍ॅटलस उपलब्ध असून काही सूचना असल्यास आयोगाच्या इडीएमडी विभागाकडे सामायिक करता येतील.

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1728226) Visitor Counter : 1628