श्रम आणि रोजगार मंत्रालय
कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि युनिसेफ दरम्यान करारावर स्वाक्षरी
प्रविष्टि तिथि:
17 JUN 2021 1:45PM by PIB Mumbai
उत्तम संधींसाठी शाश्वत आणि दीर्घकालीन बांधिलकीच्या माध्यमातून।भारतातील महिला आणि उपेक्षित घटकांसह युवा वर्गासाठी रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने भारत वचनबद्ध आहे असे केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार म्हणाले.

कामगार व रोजगार मंत्रालय आणि युनिसेफ यांच्यात आज करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर ते बोलत होते. मंत्रालय, युनिसेफ आणि संबंधित सहकारी सदस्यांची क्षमता वाढवून आपल्या देशाचे भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने योगदान आणि आकार देण्यासाठी आमच्या तरुण पिढीकडे निवड करण्यासाठी मुबलक पर्याय असतील अशी आम्ही आशा करतो. आमच्या तरुणांना संबंधित कौशल्ये आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने मंत्रालय आणि युनिसेफ यांच्यातील भागीदारीची त्यांनी प्रशंसा केली.

केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार, सचिव (कामगार व रोजगार), अपूर्व चंद्रा आणि देशातील युनिसेफच्या प्रतिनिधी डॉ. यास्मीन अली हक यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
एनसीएस अर्थात नॅशनल करिअर सर्व्हिसने कोविड --19 आणि परिणामी अर्थव्यवस्थेच्या लॉकडाऊनमुळे कामगार बाजारपेठेतील आव्हाने कमी करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, असे मंत्री म्हणाले. या उपक्रमाअंतर्गत नोकरी शोधणारे आणि मालक यांच्यातील दरी कमी करण्यासाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते जिथे नोकरीच्या नियुक्तीपासून ते उमेदवाराच्या निवडीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पोर्टलवर पूर्ण केली जाते. नोकरी शोधणाऱ्यांना थेट प्रवेश मिळावा यासाठी एनसीएस पोर्टलवर वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरातून काम करता येईल अशी नोकरी आणि ऑनलाईन प्रशिक्षणासाठी एक खास दुवा तयार करण्यात आला आहे. एनसीएसवरील या सर्व सुविधा विनामूल्य आहेत.
भारतीय युवकांना भविष्यात आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सहकार्य आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात, येत्या तीन वर्षांत युनिसेफ आणि कामगार व रोजगार मंत्रालय मोठी कामगिरी करेल, अशी अपेक्षा गंगवार यांनी यावेळी व्यक्त केली.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव श्री अपूर्व चंद्र, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे विशेष सचिव आणि युनिसेफच्या देशातील प्रतिनिधी डॉ. यास्मीन अली हक यावेळी उपस्थित होते.
***
S.Tupe/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1727966)
आगंतुक पटल : 255