अर्थ मंत्रालय

नवीन प्राप्तीकर पोर्टलमधील समस्यांबाबत अर्थ मंत्रालय 22 जून 2021 रोजी इन्फोसिस बरोबर बैठक घेणार

Posted On: 15 JUN 2021 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2021

केंद्र  सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी  22 जून 2021  रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 या वेळेत  इन्फोसिस (व्हेंडर आणि त्यांची  टीम) बरोबर प्राप्तिकर विभागाने अलिकडेच सुरु केलेल्या ई-फाईलिंग पोर्टल मधील समस्या/अडचणींविषयी संवादात्मक बैठक घेणार आहेत. आयसीएआय मधील सदस्य, लेखा परीक्षक, सल्लागार आणि करदात्यांसह इतर हितधारक देखील या परस्पर संवादाचा एक भाग असतील. नवीन पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी  / समस्या आहेत ज्यामुळे करदात्यांची गैरसोय होते.  पोर्टलमध्ये येणार्‍या अडचणी / समस्यांबाबत  लेखी निवेदन देखील हितधारकांकडून आमंत्रित केले गेले आहे. इन्फोसिस टीमचे प्रतिनिधी  प्रश्नांची उत्तरे ,  समस्येचे स्पष्टीकरण देण्यासाठी आणि पोर्टलच्या कामकाजाबाबत माहिती घेण्यासाठी आणि करदात्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी  उपस्थित असतील.

 

 Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1727374) अभ्यागत कक्ष : 281