PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 15 JUN 2021 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली/मुंबई 15 जून 2021

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती

भारतात सक्रीय रुग्णसंख्येत घट होऊन ती 9,73,158

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या 66 दिवसांनंतर 10 लाखांपेक्षा कमी

भारतात गेल्या 24 तासात 70,421 नव्या रुग्णांची नोंद; 74 दिवसांतील नीचांक

देशात आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 2,81,62,947

गेल्या 24 तासात बरे झालेल्यांची संख्या 1,19,501

सलग 32 व्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या दैनंदिन रुग्णांपेक्षा जास्त

बरे होण्याचा दर वाढून 95.43%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 5% हून कमी; सध्या हा दर 4.54%

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.72%; सलग 21 व्या दिवशी हा दर 10 टक्क्यांपेक्षा कमी

देशात चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ कायम असून  आतापर्यंत देशात एकूण 37.96 कोटींपेक्षा अधिक  चाचण्या करण्यात आल्या

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत 25.48 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

इतर अपडेट्स :

  • देशव्यापी लसीकरणाचा भाग म्हणून, केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींचा मोफत पुरवठा करत आहे. त्याशिवाय, लसींची थेट खरेदी करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार सुविधाही उपलब्ध करुन देत आहे. भारत सरकारच्या कोविड महामारी प्रतिबंध आणि व्यवस्थापन धोरणात, चाचण्या, संभाव्य रुग्णांचा माग, उपचार आणि कोविड नियमांचे पालन यासह, व्यापक लसीकरण हा ही एक महत्वाचा उपाय आहे. कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात, मुक्त आणि गतिमान लसीकरणाच्या धोरणाची अंमलबजावणी एक मे 2021 पासून सुरु झाली आहे.
  • 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती थेट नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊ शकते, जिथे ऑन साइट नोंदणी केली जाते आणि त्याच भेटीत लसीकरण केले जाते. हे "वॉक-इन" म्हणून देखील लोकप्रिय आहे.
  • कित्येक प्रसारमाध्यमांमध्ये असे सूचित करणारे वृत्तान्त आले आहेत की,  लसीकरणानंतर गंभीर  प्रतिकूल परिणाम होण्याच्या  घटनांमध्ये वाढ  झाल्यामुळे  लसीकरणानंतर 'रुग्णांचा मृत्यू' झाला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार , एकूण 23.5 कोटी लसीकरण मात्रा दिलेल्या 16 जानेवारी 2021 ते 7 जून 2021 या कालावधीत 488 मृत्यू लसीकरणानंतर झालेल्या कोविड पश्चात गुंतागुंतांशी निगडित आहेत.

महाराष्ट्र अपडेट्‌स:-

महाराष्ट्रात सोमवारी कोविड-19 चे 8,129 नवे रुग्ण आढळले. ही रुग्णसंख्या 2 मार्च नंतरची एका दिवसातली सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. यामुळे, राज्यातली एकूण रुग्णसंख्या 59,17,121 वर पोहोचली आहे. काल राज्यात, 200 जणांचा कोविडने मृत्यू झाला असून, कोविड मृत्यूसंख्या 1,12,696 पोचली आहे, अशी माहिती, आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोना रूग्णांची संख्या 2 मार्च नंतरची सर्वात कमी संख्या आहे. 2 मार्च रोजी राज्यात 7,863 रुग्ण आढळले होते. मुंबईत, काल 529 रूग्णांची नोंद झाली, जी 16 फेब्रुवारीनंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. 16 फेब्रुवारी रोजीची रुग्णसंख्या 461 होती. महाराष्ट्र सरकारने, दिव्यांग, रुग्णशय्येवर असलेले रुग्ण आणि बाहेर पडू न शकणाऱ्या व्यक्तींसाठी दारोदारी जाऊन लसीकरण मोहीम सुरु करण्याचा मानस व्यक्त केला असून त्यासाठी वेगळा प्रोटोकॉल निश्चित केला जाणार आहे.

गोवा अपडेट्‌स:-

गोव्यात सोमवारी कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या 253 ने वाढून 1,62,721 रुग्णांपर्यंत पोचली आहे. तर 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी नऊ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला, ज्यामुळे एकूण मृत्यूसंख्या 2,937 पर्यंत पोचली आहे. राज्यात 720 रुग्ण बरे झाल्यानंतर बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,55,378 इतकी झाली आहे. सध्या गोव्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,406 इतकी आहे.

Jaydevi PS/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1727344) Visitor Counter : 166


Read this release in: English , Hindi , Bengali , Gujarati