आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 लसीकरण –अद्ययावत स्थिती
आतापर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 26.69 कोटींपेक्षा अधिक लसींच्या मात्रांचा पुरवठा
राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप लसींच्या 1.05 कोटी मात्रांचा साठा शिल्लक
Posted On:
15 JUN 2021 10:07AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरणाचा भाग म्हणून, केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींचा मोफत पुरवठा करत आहे. त्याशिवाय, लसींची थेट खरेदी करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार सुविधाही उपलब्ध करुन देत आहे. भारत सरकारच्या कोविड महामारी प्रतिबंध आणि व्यवस्थापन धोरणात, चाचण्या, संभाव्य रुग्णांचा माग, उपचार आणि कोविड नियमांचे पालन यासह, व्यापक लसीकरण हा ही एक महत्वाचा उपाय आहे.
कोविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात, मुक्त आणि गतिमान लसीकरणाच्या धोरणाची अंमलबजावणी एक मे 2021 पासून सुरु झाली आहे.
या धोरणाअंतर्गत, दर महिन्याला, कोणत्याही लस उत्पादकाकडून एकूण उत्पादित आणि केंद्रीय औषध प्रयोगशाळेने मंजुरी दिलेल्या लसींपैकी 50 टक्के लसी, भारत सरकार खरेदी करत आहे. या लसींची खरेदी पुढेही सुरु राहणार असून, पूर्वीप्रमाणेच या लसींचा मोफत पुरवठा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना केला जाणार आहे.
आतापर्यंत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 26.69 कोटींपेक्षा जास्त (26,69,14,930) लसींचा पुरवठा केंद्र सरकारकडून (मोफत लस पुरवठा) तसेच राज्यांना थेट खरेदी सुविधेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
यापैकी, राज्यांनी एकूण 25,67,21,069 लसींच्या मात्रांचा वापर (वाया गेलेल्या मात्रांसह) केला आहे. ही आकडेवारी आज सकाळी आठ वाजताच्या प्राथमिक आकड्यांवर आधारित आहे.
1.05 कोटींपेक्षा जास्त (1,05,61,861) लसींच्या मात्रा अद्याप राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध असून त्या देण्याचे काम सुरु आहे.
त्याशिवाय, 47,43,580 पेक्षा अधिक लसींच्या मात्रांचा पुरवठा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना येत्या तीन दिवसात होणार आहे.
****
Jaydevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727163)
Visitor Counter : 181
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada