आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
ग्रामीण भागात कोविड लसीकरण - गैरसमज आणि तथ्ये
लसीकरण सेवेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे लसीकरणासाठी पूर्व नोंदणी आणि भेटीची वेळ आधी निश्चित करणे अनिवार्य नाही
Posted On:
15 JUN 2021 4:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2021
18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती थेट नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊ शकते, जिथे ऑन साइट नोंदणी केली जाते आणि त्याच भेटीत लसीकरण केले जाते. हे "वॉक-इन" म्हणून देखील लोकप्रिय आहे.
को-विन वर सामायिक सेवा केंद्र (सीएससी) द्वारे सुलभ नोंदणी, ही को-विन वरील नोंदणीच्या अनेक पद्धतींपैकी एक आहे. आरोग्य कर्मचारी किंवा आशा कार्यकर्ते सारख्या सेवा देणारे कर्मचारी ग्रामीण भागातील लाभार्थी आणि शहरी झोपडपट्टीत राहणाऱ्यांना एकत्र जमवून जवळच्या लसीकरण केंद्रांवर ऑन -साईट नोंदणी वर लसीकरण करण्यासाठी घेऊन जातात. 1075 हेल्प लाईनद्वारे सहाय्यक नोंदणीसाठी सुविधा देखील कार्यान्वित करण्यात आली आहे.
वरील सर्व साधने ग्रामीण भागासाठी विशेषतः कार्यान्वित केली आहेत आणि ग्रामीण भागात सर्वांना लसीकरणाची समान संधी देण्यासाठी सक्षम आहेत, हे 13.06.2021 च्या सत्यस्थितीवरून स्पष्ट होते, ज्यात को-विन वर नोंदणीकृत 28.36 कोटी लाभार्थींपैकी 16.45 कोटी (58%) लाभार्थीची नोंदणी ऑन-साइट माध्यमातून झाली आहे. तसेच 13 जून 2021 रोजी को-विनवर नोंद झालेल्या एकूण 24.84 कोटी लसीच्या मात्रांपैकी 19.84 कोटी मात्रा (एकूण मात्रांपैकी सुमारे 80%) ऑन साईट/ वॉक-इन लसीकरणाद्वारे देण्यात आल्या आहेत.
01.05.21 पासून 12.06.21 पर्यंत, लसीकरण सेवा पुरविणार्या एकूण 1,03,585 कोविड लसीकरण केंद्रांपैकी 26,114 उप-आरोग्य केंद्रांवर, 26,287 प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आणि 9,441 समाज आरोग्य केंद्रांवर कार्यरत आहेत आणि त्यांची संख्या एकूण लसीकरण केंद्रांच्या 59.7% आहे. उप-आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि समाज आरोग्य केंद्रावरील ही सर्व सीव्हीसी ग्रामीण भागात आहेत जिथे लोक ऑन साइट नोंदणी आणि लसीकरणासाठी थेट जाऊ शकतात.
को-विन वर राज्यांद्वारे ग्रामीण किंवा शहरी म्हणून वर्गीकृत केलेल्या एकूण 69,995 लसीकरण केंद्रांपैकी, 49,883 लसीकरण केंद्रे, म्हणजे 71% ग्रामीण भागात आहेत.
आदिवासी भागातील लसीकरणाची व्याप्ती को-विनवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार 3 जून 2021 रोजी-
- आदिवासी जिल्ह्यामध्ये दर दहा लाख लोकांच्या लसीकरणाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.
- 176 पैकी 128 आदिवासी जिल्हे अखिल भारतीय लसीकरणापेक्षा चांगली कामगिरी करत आहेत.
- राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत आदिवासी जिल्ह्यात अधिक प्रमाणात वॉक-इन लसीकरण होत आहे.
- आदिवासी जिल्ह्यात लसीकरण झालेल्याचे लिंग गुणोत्तर देखील चांगले आहे.
|
National
|
Tribal districts
|
Doses per million population
|
1,68,951
|
1,73,875
|
Male : Female ratio
|
54 : 46
|
53 : 47
|
Walk-in: Online vaccination
|
81 : 19
|
- : 12
|
वरील आकडेवारी ग्रामीण-शहरी तफावत संबंधी मिथक/ गैरसमज दूर करते कारण ग्रामीण भागातील आणि विशेषत: देशातील दुर्गम भागात लसीकरण नोंद सुलभ करण्यासाठी एक पूर्णपणे लवचिक आणि सर्वसमावेशक चौकट उपलब्ध आहे.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727222)
Visitor Counter : 279