आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड19 लसीकरण : गैरसमज वि. वस्तुस्थिती


लसीकरणानंतर कोणताही मृत्यू किंवा रुग्णालयात दाखल करावे लागणे हे लसीकरणामुळेच झाल्याचे गृहीत धरणे अयोग्य

“लसीकरणानंतरचा प्रतिकूल परिणाम” लसीमुळेच थेट झाला की नाही ते समजण्यासाठी, या प्रकरणांच्या तपासाअंती राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणारे कारणांचे मूल्यांकन साहाय्यकारी

Posted On: 15 JUN 2021 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2021

कित्येक प्रसारमाध्यमांमध्ये असे सूचित करणारे वृत्तान्त आले आहेत की,  लसीकरणानंतर गंभीर  प्रतिकूल परिणाम होण्याच्या  घटनांमध्ये वाढ  झाल्यामुळे  लसीकरणानंतर 'रुग्णांचा मृत्यू' झाला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार , एकूण 23.5 कोटी लसीकरण मात्रा दिलेल्या 16 जानेवारी 2021 ते  7 जून 2021 या कालावधीत 488 मृत्यू लसीकरणानंतर झालेल्या कोविड पश्चात गुंतागुंतांशी निगडित आहेत.

प्रसारमाध्यमांमधील ही वृत्ते संबंधित  प्रकरणासंदर्भात अपूर्ण आणि मर्यादित माहितीवर आधारित आहेत हे स्पष्ट करण्यात येत आहे. हे लक्षात घ्यायला हवे की,''मृत्यू झाला'' ही संज्ञा अप्रत्यक्षरीत्या, म्हणजेच मृत्यू लसीकरणामुळे झाले हे सूचीत करते.

देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणानंतर मृत्यू झालेल्यांचे प्रमाण देण्यात आलेल्या 23.5 कोटी मात्रांच्या तुलनेत 0.0002% आहे .  जे लोकसंख्येच्या प्रमाणात अपेक्षित मृत्यूदरापेक्षा कमी आहे.हे  मृत्यू लोकसंख्येच्या तुलनेत अपेक्षित मृत्यू दराच्या प्रमाणात आहे. लोकसंख्येमध्ये मृत्यूचा विशिष्ट दर असतो . एसआरएस म्हणजेच नमुना नोंदणी प्रणालीच्या आकडेवारीनुसार ,2017 मधील स्थूल  मृत्यूचे वार्षिक प्रमाण प्रति 1000 व्यक्ती 6.3 आहे. (नमुना नोंदणी प्रणाली,महानिबंधक आणि जनगणना आयुक्त, भारत https://main.mohfw.gov.in/sites/default/files/HealthandFamilyWelfarestatisticsinIndia201920.pdf).

हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आणि समर्पक आहे की, कोविड 19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 1% पेक्षा जास्त आहे आणि कोविड -19प्रतिबंधक  लसीकरण या मृत्यूंना  प्रतिबंध करते. म्हणूनच, कोविड 19 या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूच्या  तुलनेत लसीकरणानंतर मृत्यू होण्याचा  धोका नगण्य आहे.

'लसीकरणानंतर कोणतीही अनुचित वैद्यकीय घटना' अशी  या लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांची  (एईएफआय) व्याख्या करण्यात आली असून त्याचा लसीच्या वापराशी कार्यकारण संबंध अनावश्यक आहे. ही कोणतीही प्रतिकूल किंवा अनपेक्षित लक्षणे , प्रयोगशाळेतील असामान्य निष्कर्ष , लक्षणे  किंवा आजार  ’असू शकतात. लसीकरणानंतरचे सर्व मृत्यू, रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण, लसीकरणानंतर कोणत्याही क्षणी रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण तसेच लसीकरणानंतरच्या  काही किरकोळ किंवा प्रतिकूल घटना यासंदर्भात भारत सरकार तसेच राज्य सरकारांनी आरोग्य सेवक, डॉक्टर आणि लस प्राप्तकर्त्यांना माहिती देण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे

कोणत्याही लसीकरणानंतर मृत्यू किंवा रुग्णालयात दाखल करणे  किंवा अपंगत्व किंवा चिंता उद्भवणाऱ्या  घटना गंभीर किंवा गंभीर प्रकरणांमध्ये वर्गीकृत आहेत आणि त्यांची जिल्हा पातळीवर चौकशी केली जाते .या  प्रकरणांच्या तपासाअंती  राज्य आणि  राष्ट्रीय स्तरावर करण्यात येणारे कारणांचे मूल्यांकन, लसीकरणानंतरचा प्रतिकूल परिणाम लसीमुळे थेट झाला की नाही ते समजण्यासाठी साहाय्यकारी आहे. म्हणूनच, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर एईएफआय समित्यांद्वारे तपासणी केल्याशिवाय लसीकरणानंतर  कोणताही मृत्यू किंवा रुग्णालयात  दाखल होणे हे लसीकरणामुळे झाल्याचे आपोआपच गृहित धरले जाऊ शकत नाही आणि त्याचा संबंध लसीकरणाशी लावता येणार नाही.

जिल्हा ते राज्यापर्यंत प्रत्येक स्तरावर देखरेख ठेवण्यासाठी एईएफआय ही एक  एक सक्षम  यंत्रणा आहे. एकदा तपासणी पूर्ण झाल्यावर कोविड प्रतिबंधक लसीकरणाशी संबंधित पारदर्शक माहिती दिल्यावर  हे अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जातात.

 

G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1727259) Visitor Counter : 298