श्रम आणि रोजगार मंत्रालय
सामाजिक सुरक्षा विषयक संहिता, 2020 अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईविषयक नियमावली मसुद्याची अधिसूचना जारी
Posted On:
15 JUN 2021 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2021
केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सामाजिक सुरक्षाविषयक संहिता 2020 अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई विषयीच्या नियमावलीचा मसुदा 3 जून 2021 रोजी अधिसूचित केला आहे. या मसुद्यावर संबंधितांच्या काही हरकती अथवा सूचना असल्यास, त्या मागवण्यात आल्या आहेत. या सूचना अथवा हरकती मसुदा अधिसूचित केल्याच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत पाठवायच्या आहेत.
सामाजिक सुरक्षा विषयक संहिता, 2020 अंतर्गत, सामाजिक सुरक्षाविषयक नियमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली असून हे नियम अधिक मजबूत करण्यात आले आहेत. याचा उद्देश, संघटीत तसेच असंघटीत क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांना अधिक सामाजिक सुरक्षा पुरवणे हा आहे.
सामाजिक सुरक्षाविषयक संहिता 2020 च्या प्रकरण VII (कर्मचारी नुकसानभरपाई) नुसार, प्राणघातक अपघात झाल्यास, गंभीर दुखापत किंवा कामामुळे होणारे आजार झाल्यास कर्मचाऱ्यांच्या नुकसानभरपाईची कंपनी मालक/व्यावसायिकांची जबाबदारी यात निश्चित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या कर्मचारी नुकसानभरपाई विषयक नियमावलीनुसार, नुकसानभरपाईच्या दाव्यांसाठी अर्ज कसा करावा, किंवा हे दावे निकाली काढण्याविषयीची प्रक्रिया, नुकसानभरपाई मिळण्यास विलंब झाल्यास, रकमेवर व्याजदर किती असेल, नुकसानभरपाईची प्रक्रिया कुठे होईल, या प्रकरणाचे हस्तांतरण करायचे झाल्यास, ते कुठे करता येईल, त्याविषयीची नोटीस आणि एका अधिकृत खात्यातून दुसऱ्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया याची सविस्तर माहिती दिली आहे.
सामाजिक सुरक्षाविषयक संहितेअंतर्गत, अधिसूचित नियमावलीचा मसुदा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, ग्रॅच्युइटी, प्रसूती लाभ, सामाजिक सुरक्षा आणि इमारत तसेच इतर बांधकाम मजूरांशी संबंधित उपकर, असंघटीत क्षेत्रातील कामगार, मजूर,हमाल यांची सामाजिक सुरक्षा आणि रोजगार माहिती या सर्वांची अधिसूचना 13 नोव्हेंबर 2020 रोजी जारी करण्यात आली होती.
सामाजिक सुरक्षाविषयक संहितेअंतर्गत नियमावलीचा मसुदा ( कर्मचारी नुकसानभरपाई) केंद्रीय नियम, 2021 (हिंदी आणि इंग्रजी) बघण्यासाठी इथे क्लिक करा: https://labour.gov.in/whatsnew/draft-social-security-employees-compensationcentral-rules-2021-framed-inviting-objections.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727297)
Visitor Counter : 384