रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेला स्पेक्ट्रमचे वाटप आणि रेल्वे परिचालनातील सर्वांगीण सुरक्षेसाठी अधिक आधुनिक सिग्नलिंग उपायांची तरतूद


स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये सार्वजनिक सुरक्षा आणि सुरक्षा सेवांसाठी भारतीय रेल्वेला 700 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी बँडमध्ये 5 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम वितरित करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे

भारतीय रेल्वेच्या 92% मार्गावर ओएफसी आधारित प्रणाली (62,205 RKms)

सिग्नल यंत्रणा आणि दूरसंचारच्या आधुनिकीकरणासाठी भारतीय रेल्वेने सुमारे 55,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची कल्पना मांडली आहे

Posted On: 15 JUN 2021 4:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2021

सिग्नलिंग प्रणाली रेल्वेगाडीच्या परिचालनात  सुरक्षा वाढवते. भारतीय रेल्वे वापरत असलेली उपकरणे सुधारणे आणि ती बदलणे  ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि त्याची स्थिती, परिचालन गरजा आणि संसाधनांची उपलब्धता यावर आधारित आहे.

रेल्वे परिचालनात  सुरक्षितता आणखी वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त लाईन क्षमता निर्माण करण्यासाठी सिग्नलिंग प्रणालीच्या  आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे ज्यामध्ये-

सुरक्षा आणि लवचिकता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची (ईआय) तरतूद - रेल्वे परिचालनात डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी आणि सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग मोठ्या प्रमाणात स्वीकारले जात आहे.

लाइन क्षमता वाढवण्यासाठी स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग (एबीएस) - भारतीय रेल्वेच्या विद्यमान उच्च घनतेच्या मार्गांवर अधिक गाड्या चालवण्यासाठी लाइन क्षमता वाढवण्यासाठी, स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग हा एक किफायतशीर  उपाय आहे. 30.04.2021 रोजी, 3447 किमी मार्गावर  स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग सुविधा प्रदान करण्यात आली  आहे.

लेव्हल क्रॉसिंग गेट्सवरील सुरक्षा - लेव्हल क्रॉसिंग गेट्सवरील सुरक्षा वाढवणे हा चिंतेचा विषय बनला  आहे. सिग्नलसह इंटरलॉकिंग लेव्हल क्रॉसिंगमुळे सुरक्षेत वाढ होते. 30.04.2021 रोजी, भारतीय रेल्वेने लेव्हल क्रॉसिंगवरील सुरक्षा वाढवण्यासाठी 11705 लेव्हल क्रॉसिंग गेटवर सिग्नलसह  इंटरलॉकिंग केले  आहे.

मानवी चुका  टाळण्यासाठी लोको पायलटला मदत म्हणून स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) प्रणाली - जगातील प्रगत रेल्वे प्रणाली एटीपी प्रणालीचा वापर  लोको पायलट्सला मदत म्हणून करत  आहेत. लोको पायलटकडून कोणतीही मानवी चूक झाल्यास टक्कर रोखण्याचे काम ही प्रणाली करते.

अधिक माहितीसाठी कृपया पहा

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1727240) Visitor Counter : 137