जलशक्ती मंत्रालय

जलशक्ती अभियान-2 मध्ये सहभागी होण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी जलशक्ती राज्यमंत्र्यांचे सर्व खासदारांना आवाहन


मान्सून हंगामात पाणी वाचविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी खासदारांच्या पाठिंब्याची आणि सहयोगाची अपेक्षा

Posted On: 15 JUN 2021 4:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2021

"जल शक्ती अभियान  : कॅच द रेन" मोहिमेला आपापल्या संबंधित मतदार संघांमध्ये आणि राज्यामध्ये पाठींबा द्यावा, यासाठी जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाच्या खासदारांना वैयक्तिक पत्र लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2021 रोजी जागतिक जल दिवसानिमित्त कॅट द रेन व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स (जिथे पडेल, जेव्हा पडेल.. पाऊस साठवा) या आशयाच्या मोहिमेला प्रारंभ केला होता.

या पत्रात अभियानाचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे आणि खासदारांना यापूर्वी मोहिमेसंदर्भात झालेल्या प्रगतीची माहिती देण्यात आली आहे. आगामी मान्सूनच्या हंगामामध्ये पावसाचे पाणी वाचविण्याबाबत (साठविण्याबाबत) लोकांमध्ये संवेदनशील जनजागृती करण्यासाठी सहयोग देण्याबाबत आणि पाठिंबा देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. कटारिया यांनी माहिती दिली की, आपापल्या मतदार संघांमध्ये या मोहिमेसाठी आपण ब्रँड अँबॅसेडर व्हावे, असे आवाहन प्रत्येक खासदाराला करण्याच्या उद्देशाने हे पत्र पाठविण्यात आले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होण्याची आणि पाणी टंचाईची सर्वसाधारण समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जनतेच्या हितासाठी उभे राहिले पाहिजे, असे कटारिया यांनी नमूद केले.

कोविड-19 महामारीचे आव्हान समोर उभे असताना देखील, मोहिमेला प्रारंभ झाल्यानंतर मागील 2 महिन्यांमध्ये या बाबतीत लक्षणीय कामगिरी झाली आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाने 1.64 लाख जलसंधारण आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग (आरडब्ल्यूएच), पावसाच्या पाण्याच्या पुनर्वापरासंबंधीच्या संरचनांचे बांधकाम पूर्ण केल्याची माहिती दिली आहे, 5,360 कोटी रुपये खर्च झाले असून 1.82 लाख अतिरिक्त बांधकामांवर काम सुरू आहे. 2,666 कोटी रुपयांच्या खर्चासह आजपर्यंत 37,428 पारंपरिक बांधकाम संरचना पद्धतीच्या विद्यमान जलसाठ्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून लवकरच 42,000 अतिरिक्त बांधकामांचे पुरुज्जीवन केले जाणे अपेक्षित आहे.

ग्रामीण विकास विभागाच्या मनरेगा योजनेअंतर्गत एकूण 14,000 कोटी रुपयांची जलसंधारणा संदर्भात असलेली कामे पूर्ण झाली आहेत अथवा  सध्या सुरू आहेत.

 

M.Chopade/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1727219) Visitor Counter : 222