विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
जर्मन उद्योग तसेच औद्योगिक संशोधन आणि विकास संस्थांमधील औद्योगिक संधींसाठी तरुण भारतीय संशोधकांना पाठबळ देणारी आयजीएसटीसी औद्योगिक शिष्यवृत्ती सुरू
Posted On:
15 JUN 2021 3:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2021
इंडो-जर्मन विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र (आयजीएसटीसी) च्या 11 व्या स्थापना दिनानिमित्त, 14 जून, 2021 रोजी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा यांनी औद्योगिक शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा आरंभ केला.
हा शिष्यवृत्ती कार्यक्रम क्षमता बांधणीसाठी तसेच उद्योगांसमोरील आव्हानांचा आणि उद्योगांमधील संशोधन उपायांचा विचार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करेल. जर्मन तंत्रज्ञानामधील उपयोजित संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि औद्योगिक अनुभवाबद्दल युवा संशोधकांना प्रोत्साहन मिळेल, असे प्रा. आशुतोष शर्मा यांनी सांगितले.
जर्मन उद्योग आणि औद्योगिक संशोधन आणि विकास संस्थांमधील औद्योगिक संधीसाठी आयजीएसटीसी औद्योगिक शिष्यवृत्ती, युवा भारतीय पीएचडीचे विद्यार्थी तसेच विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील पोस्ट-डॉक्टरेट संशोधकांना पाठबळ देईल.
जास्तीत जास्त एका वर्षासाठी आकर्षक अनुदानाचे साहाय्य असलेल्या, या शिष्यवृत्तीचे उद्दीष्ट, तरुण भारतीय संशोधकांना उपयोजित संशोधनासाठी प्रवृत्त करणे आणि प्रगत जर्मन औद्योगिक क्षेत्रात संधींद्वारे नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासासाठी क्षमता वाढवणे हे आहे.
आयजीएसटीसी नियामक मंडळ सह - अध्यक्ष आणि सदस्य, भारतीय आणि जर्मन सरकारांचे त्याचप्रमाणे उद्योग आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत आभासी बैठकीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
G.Chippalkatti/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727211)
Visitor Counter : 203