प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाद्वारे कोविड 19 प्रकल्प: रुग्णालयांचा विस्तार
Posted On:
13 JUN 2021 2:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2021
देशाच्या विविध भागात कोविड -19 रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण होता. या दरम्यान नाविन्यपूर्ण अत्याधुनिक रुग्णालये एक मोठा दिलासा म्हणून पुढे आली. ही अत्याधुनिक रुग्णालये हा रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार आहे आणि हे रुग्णालय विद्यमान रुग्णालयाच्या इमारतीशेजारीच बांधले जाऊ शकते. प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने राष्ट्रीय महत्वाच्या विविध प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी खासगी क्षेत्रातील कंपन्या, देणगीदार संस्था आणि व्यक्तींना आमंत्रित केले. रुग्णालयांचा विस्तार हा प्रकल्प अशा प्रकारचाच एक उपक्रम आहे. जिथे सर्वाधिक कोविड रुग्णांची संख्या नोंदविण्यात आली त्या राज्यातील सुमारे 50 रुग्णालयांची आवश्यकता प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाकडून निश्चित करण्यात आली
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास (आयआयटी-एम) यांनी मॉड्यूलस हाउसिंग या स्टार्ट-अप उपक्रमाद्वारे मेडिकॅब रुग्णालये विकसित केली. या उपक्रमाद्वारे 3-आठवड्यांच्या कालावधीत 100 खाटा असलेली रुग्णालयाची विस्तारीत सुविधा उभारण्यात येते. मेडीकॅब रुग्णालये अतिदक्षता विभाग (आयसीयू) च्या समर्पित क्षेत्रासह तयार केली गेली आहेत ज्यात जीवरक्षक उपकरणे आणि वैद्यकीय उपकरणे समाविष्ट आहेत. एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवता येतील अशा या 'निगेटीव्ह प्रेशर पोर्टेबल रुग्णालये ' यांची टिकाऊ क्षमता साधारण 25 वर्षे आहे, आणि भविष्यात कोणत्याही आपत्तीच्या प्रतिसादासाठी या रुग्णालयांना एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत देखील हलवले जाऊ शकते. ही वेगाने तैनात करण्यात येणारी रुग्णालये कोविड-19, विरुद्धच्या भारताच्या लढ्यात विशेषत: ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये.आरोग्याच्या प्रमुख पायाभूत सुविधांमधील दरी कमी करतील. ओएस / पीएसए हे प्रकल्प देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात राबविण्यासाठी सीएसआर समर्थन मिळविण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. हे प्रकल्प देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात राबविण्याच्या दृष्टीने सीएसआर म्हणजेच उद्योगांकडून सामाजिक उत्तरदायित्व साहाय्य मिळविण्यासाठी प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय सक्रियपणे कार्यरत आहेत.
मॉड्यूलस हाऊसिंगने अमेरिकन इंडियन फाउंडेशन (एआयएफ) च्या मदतीने मेडिकॅब विस्तारीत रुग्णालये तैनात करण्यास सुरवात केली आहे. मास्टरकार्ड, टेक्सास इंस्ट्रुमेंट्स , झेडस्केलर, पीएनबी हाउसिंग, गोल्डमन सॅक्स, लीनोवो आणि नॅसकॉम फाउंडेशननेही सामाजिक उत्तरदायित्व साहाय्य वाढविले आहे.
बिलासपूर (छत्तीसगड); अमरावती, पुणे, आणि जालना (महाराष्ट्र) या ठिकाणी 100 खाटा असलेल्या रुग्णालयांचा पहिला संच सुरु केला जात आहे.
या प्रकल्पाविषयीच्या शंकांविषयी लिहा
industry-engagement[at]psa[dot]gov[dot]in
प्रकल्पांच्या विस्तृत माहितीसाठी इथे भेट द्या : https://www.psa.gov.in/innovation-science-bharat
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726775)
Visitor Counter : 253