ऊर्जा मंत्रालय

पॉवरग्रीडच्या देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम

Posted On: 12 JUN 2021 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2021

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (POOWERGRID) हा भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येणारा  सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न उपक्रम आहे. कोविड 19 महामारीला सामोरे जाण्यासाठी पॉवरग्रीडने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वेळोवेळी विविध प्रकारची मदत प्रदान केली. या वेगवेगळ्या उपक्रमांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि वेळेवर सुरू केलेला उपक्रम म्हणजे पॉवग्रीडच्या विविध कार्यालयांमध्ये लसीकरण मोहिमेचे आयोजन.

केंद्र सरकारच्या दवाई भी कडाई भी या उक्तीनुसार, पॉवरग्रीडच्या पश्चिम विभाग-1 ने नागपूर येथे नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने लसीकरण शिबिर आयोजित केले होते. कर्मचाऱ्यांच्या शिवाय, 45 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेले त्यांचे कुटुंबीय, कंत्राटी  कामगार, सुरक्षा कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले.

नागपूरमधील एका  रुग्णालयाच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या दुसऱ्या आणखी एका लसीकरण शिबिरामध्ये 143 व्यक्तींना लसीची मात्रा देण्यात आली.

मुंबई येथील हिरानंदानी हॉस्पिटल येथे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि कंत्राटी कर्मचारी अशांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 55 व्यक्तींचे  लसीकरण करण्यात आले.

भिवंडी उप-केंद्र येथेही  सरकारच्या सहकार्याने लसीकरण शिबिरआयोजित करण्यात आले.

Jaydevi PS/S.Shaikh/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1726610) Visitor Counter : 206