आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण : अद्ययावत माहिती


लसीकरणाबाबतचा डेटा डार्क वेबवर लिक केल्याचा हॅकर्सचा दावा खोटा असल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि लसीकरण अंमलबजावणीविषयक अधिकारप्राप्त गटाकडून स्पष्ट

कोविन ॲपवर असलेला नागरिकांचा सर्व डेटा सुरक्षित राहील यासाठी आम्ही वेळोवेळी आवश्यक ती पावले उचलत आहोत: डॉ आर एस शर्मा

प्रविष्टि तिथि: 12 JUN 2021 12:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2021

कोविन ॲप व्यवस्थेवरील नागरिकांची माहिती कथितरित्या (डेटा) हॅक म्हणजेच चोरी झाल्याच्या प्रकरणाचा तपास, इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कॉम्प्युटर आप्तकालीन प्रतिसाद चमूद्वारे केला जात आहे.

लसीकरण अंमलबजावणी विषयक अधिकारप्राप्त गटाचे अध्यक्ष डॉ आर. एस. शर्मा यांनी याबाबत स्पष्ट माहिती देतांना सांगितले की, ‘या ॲपवरची माहिती डार्क वेब (ज्यावर हॅकिंग केले जाते असे बनावट संकेतस्थळ) द्वारे चोरी केल्याचा कथित हॅकर्सचा दावा खोटा आणि निराधार आहे. कोविन ॲपवरील नागरिकांची माहिती सुरक्षित राखण्यासाठी आम्ही वेळोवेळी, आवश्यक ती पावले उचलत असतो आणि हा डेटा सुरक्षित असल्याची खात्री करत असतो.

***

SonalT/RadhikaA/CYadav


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1726491) आगंतुक पटल : 330
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Tamil , Telugu , Kannada , Malayalam