PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 11 JUN 2021 6:27PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई 11 जून 2021

 


https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

 

  • Less than 1 lakh cases for the 4th Day
  • India reports91,702 newcases in last 24 hours
  • 1,34,580patients recovered during last 24 hours
  • Recoveries continue to outnumber Daily New Cases for the 29th consecutive day
  • Recovery Rate increases to 94.93%
  • Weekly Positivity Rate currently at 5.14%
  • Daily positivity rate at 4.49%, less than 10% for 18 consecutive days.
  • Testing capacity substantially ramped up–37.42 crore tests total conducted
  • 24.6 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive

 

#Unite2FightCorona#IndiaFightsCorona

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

Image

Image

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

देशव्यापी लसीकरण अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा मोफत पुरवत आहे. चाचणी, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, उपचार आणि कोविडला प्रतिबंध करणारे वर्तन यासह लसीकरण हा सुद्धा महामारी प्रतिबंध आणि व्यवस्थापन धोरणाचा अविभाज्य भाग आहे.

कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील व्यापक आणि गतिशील धोरणाला 1 मे 2021पासून सुरुवात झाली.

या धोरणाअंतर्गत, प्रत्येक महिन्यात कोणत्याही उत्पादकाच्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेने (सीडीएल) मान्यता दिलेल्या 50 टक्के लसीच्या मात्रा केंद्र सरकार खरेदी करेल. आधीप्रमाणेच राज्य सरकारांना या मात्रा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील.

केंद्र सरकारकडून मोफत आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 25.60 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा (25,,60,08,080) राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पुरवल्या आहेत.

आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार,वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 24,44,06,096 मात्रा देण्यात आल्या आहेत.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.17 कोटींपेक्षा जास्त (1,17,56,911) मात्रांचा साठा उपलब्ध आहे.


याशिवाय येत्या 3 दिवसात 38 लाखापेक्षा अधिक (38,21,170) लसीच्या मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना प्राप्त होतील.

 

इतर अपडेटस्

  • ग्रामीण भागांत लसीबद्दल दोलायमानता असल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांकडून होत असल्याची काही वृत्ते प्रसारमाध्यमांतून फिरत आहेत. लसीबद्दलची दोलायमानता / संकोच ही संकल्पना जगभरात सर्वत्र स्वीकारण्यात आलेली असून, समुदाय स्तरावर वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून तिच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन कोविड-19 लसीकरण रणनीती आखण्यात आली होती. https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1726251लसीबद्दलच्या दोलायमानतेविषयी त्यात सविस्तर चर्चा करण्यात आली असून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रारंभीच ती रणनीती सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना प्रदान करण्यात आली होती. ही रणनीती सर्व राज्यांच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनाही 25 जानेवारी 2021 रोजी देण्यात आली होती. राज्यांतील लसीकरणाविषयी प्रारंभिक माहिती देतानाच संबंधित आयइसी (माहिती, शिक्षण आणि संवाद) अधिकाऱ्यांनाही याबद्दल सांगण्यात आले होते. सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये या रणनीतीचे पालन होत असून स्थानिक गरजांनुसार तिचा अंगीकार करण्यात येत आहे. राज्य पातळीवर उचित पद्धतीने ही रणनीती अमलात आणण्यासाठी विविध प्रकारच्या प्रसारमाध्यमांना साजेसे आयइसी (माहिती, शिक्षण आणि संवाद) साहित्य तयार करून त्याचे वाटप करण्यात आले आहे.
  • कोविड महामारी ही जागतिक आरोग्यामधील मागील शतकातली एक अभूतपूर्व घटना आहे, ज्यामुळे जगाच्या संवाद आणि वर्तन शैलीत आमूलाग्र बदल झाला. लोकांचे कोविड -19 संसर्गापासून संरक्षण आणि संबंधित मृत्यू आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण महत्त्वपूर्ण आहे. कोविड -19 महामारी संपुष्टात आणण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी लसींची न्याय्य उपलब्धता महत्त्वपूर्ण आहे. लस विकसित करण्यात बराच वेळ लागतो आणि या लसींची मागणी अनेकदा पुरवठ्यापेक्षा जास्त असते. म्हणूनच महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या मौल्यवान साधनाचा चांगला आणि योग्य प्रकारे वापर सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कोविड -19 प्रतिबंधक लस ही आवश्यक सार्वजनिक आरोग्य वस्तू असून जगभरात तिची टंचाई आहे. म्हणूनच, लसीचा अपव्यय कमी करणे आणि किमान पातळीवर ठेवणे आवश्यक आहे ज्यामुळे अनेक लोकांचे लसीकरण करण्यास मदत होईल. पंतप्रधानांनी देखील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी वेळोवेळी लसीचा किमानअपव्यय सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे.
  • केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, जे प्रतिष्ठित आरएसएसडीआय (रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया) चे आश्रयदाते असून मधुमेह आणि औषध विज्ञानचे माजी प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की मधुमेह आणि कोविड यामधील परस्पर संबंधाबद्दल अधिक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, कारण या दोघांमध्ये कारणे आणि परिणामाच्या संबंधाबद्दल काही गैरसमज आहेत. “डायबेटीस इंडिया” वर्ल्ड कॉंग्रेस -2021 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटनपर भाषण देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही कोविडने आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत नवीन निकष शोधण्यास प्रवृत्त केले, जे अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदांच्या यशामध्ये दिसून येते.
  • केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या महासभेच्या (UNGA) 75 व्या अधिवेशनाला संबोधित केले. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी 75/260 या ठरावाचा उल्लेख केला, जो एचआयव्ही/एड्सवरील वचनबद्धतेच्या घोषणापत्राची अंमलबजावणी आणि एचआयव्ही/ एड्सवरील राजकीय घोषणापत्राशी निगडित आहे.

 

 

महाराष्ट्र अपडेट्स :-

महाराष्ट्राने लसीकरण मोहिमेत नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 2 कोटी 50 लाख मात्रा देऊन विक्रमी टप्पा पार केला आहे. राज्यातील 2 कोटी नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली असून 50 लाख नागरिकांचे लसीच्या दोन मात्रा घेऊन पूर्ण लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रात गुरुवारी 12,207 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली तर 393 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे राज्यात आतापर्यंतच्या कोविड बाधितांची संख्या 58,76,087 तर बळींची संख्या 1,03,748 झाली आहे. राज्यात गेल्या तीन दिवसांमध्ये नोंदल्या जात असलेल्या कोविड बाधितांच्या संख्येपेक्षा गुरुवारी थोड्या अधिक व्यक्ती बाधित झाल्याचे दिसून आले. राज्याचा रोगमुक्ती दर सध्या 95.45% आहे तर मृत्यू दर 1.77% आहे. मुंबईत गुरुवारी 660 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, यावर्षी 23 फेब्रुवारीनंतरचा हा मुंबईतल्या रुग्णसंख्येचा नीचांक आहे. 

 

गोवा अपडेट्‌स:-

गोवा राज्यात गुरुवारी 413 नव्या कोविड बाधितांची नोंद झाल्यामुळे राज्यातील एकूण कोविड रुग्णांची संख्या 1,61,153 वर पोहोचली तर  600 जण रोगमुक्त झाले. राज्यात कोविडमुळे आणखी 13 जणांचा मृत्यू झाल्यामुळे बळींची एकूण संख्या आता 2,891 झाली आहे असे त्यांनी सांगितले. दिवसभरात, 585 रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडल्यामुळे राज्यातील एकूण कोविड मुक्त झालेल्यांची संख्या आता 1,52,657 झाली आहे.

Important Tweets

3

/strong>

\

11000

12000

***

M.Chopade/S.Chitnis/P.Kor


(Release ID: 1726366) Visitor Counter : 255