कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री आणि प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ डॉ. जितेंद्र सिंह यांनी मधुमेह आणि कोविड यांच्यातील परस्पर संबंधांबाबत जनजागृती मोहीम राबवण्याचे आवाहन केले
डायबिटीज इंडिया वर्ल्ड कॉंग्रेस -2021 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटनपर भाषण
Posted On:
11 JUN 2021 5:44PM by PIB Mumbai
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, जे प्रतिष्ठित आरएसएसडीआय (रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया) चे आश्रयदाते असून मधुमेह आणि औषध विज्ञानचे माजी प्राध्यापक आहेत. ते म्हणाले की मधुमेह आणि कोविड यामधील परस्पर संबंधाबद्दल अधिक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, कारण या दोघांमध्ये कारणे आणि परिणामाच्या संबंधाबद्दल काही गैरसमज आहेत.
“डायबेटीस इंडिया” वर्ल्ड कॉंग्रेस -2021 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटनपर भाषण देताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही कोविडने आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत नवीन निकष शोधण्यास प्रवृत्त केले, जे अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय परिषदांच्या यशामध्ये दिसून येते.
डॉ जितेंद्र सिंग म्हणाले, गेल्या दोन दशकांत भारतामध्ये टाइप -2 मधुमेह विकारात मोठी वाढ झाली आहे, ज्याचे प्रमाण आता देशभरात वाढले आहे. टाइप 2 मधुमेह हा आजार दोन दशकांपूर्वी दक्षिण भारतात प्रचलित होता, आज तो उत्तर भारतातही तितकाच सर्रासपणे आढळतो आणि त्याच वेळी महानगर, शहरे आणि नागरी भागातून ग्रामीण भागांतही पोहचला आहे.
जनजागृती करण्यासाठी कोविड-डायबेटिस शैक्षणिक कार्यक्रमांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
ते म्हणाले की कोविड संपुष्टात आल्यावरही सामाजिक अंतर आणि इतर योग्य वर्तनातून संसर्ग टाळण्याची शिस्त इतर अनेक संसर्गापासून, विशेषतः ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी संरक्षण म्हणून कार्य करेल.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, मधुमेह ग्रस्त असलेल्यांची प्रतिकारशक्ती कमी असते आणि यामुळे मधुमेह ग्रस्त असलेल्या रुग्णाला मूत्रपिंडाचा त्रास किंवा मधुमेह-नेफ्रोपॅथी, मूत्रपिंडाचा गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाचे अध्यक्ष डॉ. अख्तर हुसेन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, चीननंतर भारत दुसर्या क्रमांकाचा सर्वात प्रभावित देश आहे. कोविड नंतरच्या काळात ही गुंतागुंत वाढेल असा इशाराही त्यांनी दिला.
मधुमेहाच्या क्षेत्रात अग्रगण्य कार्याबद्दल देशातील अनेक डॉक्टरांना डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुरस्कार प्रदान केले.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726274)
Visitor Counter : 281